शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात बनावट नोटांचे आमिष देणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:02 IST

अकोला: चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीनपट अधिक नोटा देण्याचे आमिष देऊन बनावट नोटा माथी मारणाऱ्या दरोडेखोरांच्या एका टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला.

ठळक मुद्देविशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट व खऱ्या नोटा जप्त केल्या. पाच जणांच्या टोळीने अनोखा फंडा वापरत अनेकांना अशा पध्दतीने गंडविल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला प्राप्त झाली होती. ही टोळी कुणाला तरी हेरू न १ लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल ४ ते ५ लाख रुपये खºया नोटा देण्याचे आमिष देत होते.

अकोला: चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीनपट अधिक नोटा देण्याचे आमिष देऊन बनावट नोटा माथी मारणाऱ्या दरोडेखोरांच्या एका टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकावर नोटांची देवाण-घेवाण सुरू असतानाच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट व खऱ्या नोटा जप्त केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील वरुट येथील रहिवासी कमल अफसर शहा, याच तालुक्यातील कलगाव येथील मोहम्मद शाकीर अब्दुल वकील व दिग्रस येथील मोतीनगरमधील रहिवासी हुसेन बग्गू गारवे तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील आसीफ खा शौकत खा व रिना नामक महिला या पाच जणांच्या टोळीने अनोखा फंडा वापरत अनेकांना अशा पध्दतीने गंडविल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला प्राप्त झाली होती. ही टोळी कुणाला तरी हेरू न १ लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल ४ ते ५ लाख रुपये खºया नोटा देण्याचे आमिष देत होते. एक लाख रुपयांच्या मोबदल्यात ४ ते ५ लाख मिळत असल्याने अनेकांनी या टोळीशी संपर्क साधला. समोरील व्यक्ती १ लाख रुपयांच्या खºया नोटा घेऊन येताच ही टोळी त्या नोटा घेऊन पसार होत होती. हा प्रकार विशेष पथकाच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक तयार करू न सदर टोळीशी संपर्क साधला. या टोळीने सदर ग्राहकाला चलनातून बाद झालेले ३० लाख रुपये देण्याचे आमिष दिले. या मोबदल्यात ग्राहकाने या टोळीला खºया नोटांचे १० लाख रुपये देण्याचा सौदा ठरला.दरम्यान,मध्यवर्ती बसस्थानकावर हा व्यवहार सुरू असतानाच दबा धरून असलेल्या विशेष पोलीस पथकाने या टोळीतील कमल अफसर शहा, मोहम्मद शाकीर अब्दुल वकील, हुसेन बग्गू गारवे, आसिफ खा शौकत खा यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट व मुलांच्या खेळण्यातील नोटा जप्त केल्या. या टोळीतील रिना नामक महिला मात्र फरार होण्यात यशस्वी झाली. या पाचही आरोपींवर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस