शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली खोदले रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:15 IST

अकोलेकरांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातनांकडे सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने ऐन पावसाळ््यात रस्त्यांचे खोदकाम केले. संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरवस्था केल्याचे चित्र असून, रस्ते दुरुस्तीला कंत्राटदाराने ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराच्या मनमानीवर मनपा प्रशासनाचे कवडीचेही नियंत्रण नसून, पावसाळ््यात अकोलेकरांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातनांकडे सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलून नवीन टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी मनपा प्रशासनाने ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ नामक कंपनीची नियुक्ती केली. कंपनीच्या मनमानी कारभारावर मनपाचे कवडीचेही नियंत्रण नसल्यामुळे भर पावसाळ्यात मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्या जात आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे भाग असताना कंपनीकडून दुरुस्तीला ठेंगा दाखविल्या जात असल्याने नादुरुस्त रस्त्यातून वाट काढताना अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ््यात रस्ते खोदून ठेवल्यानंतर त्यांची दुरुस्ती का नाही, असा जाब विचारण्याची जबाबदारी अकोलेकरांनी सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांवर सोपवली असताना सर्वांनी चुप्पी साधणे पसंत केल्याचे दुर्दैवी चित्र आहे.गीता नगरमध्ये जीवघेणा खड्डाजलवाहिनीचा व्हॉल्व्ह बसविण्यासाठी ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ कंपनीने गीता नगरमध्ये मुख्य रस्त्यालगत भला मोठा खड्डा खोदला. मागील महिनाभरापासून व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या नावाखाली हा खड्डा जैसे थे आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने घसरून अपघाताची शक्यता बळावली आहे. यावरून भाजप नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन केले जात आहे.

पावसाळ््यापूर्वी रस्ते दुरुस्ती नाहीच!टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्ससमोरील सिमेंट रस्ता, छत्रपती शिवाजी पार्क रस्ता, अग्रसेन चौक, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रस्ता, पंचायत समितीसमोरील रस्ता, वाशिम बायपास ते हरिहरपेठ, महाराणा प्रताप बाग ते खोलेश्वरपर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसाळ््यापूर्वी रस्ते दुरुस्ती शक्य असताना याकडे प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने दुर्लक्ष का केले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.या रस्त्यावरून जाताय..., सावधान!उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी, यासाठी भाजप लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. २६७ कोटींच्या निधीतून खदान पोलीस ठाणे ते थेट अग्रसेन चौकापर्यंत उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असले तरी मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. पुलाखाली दोन्ही बाजूंनी ‘साइड रोड’चे अर्धवट काम केल्यानंतर संबंधित कंपनीने हात वर केले. या मार्गावर खड्ड्यांमुळे ट्रकखाली चिरडून अनेकांचे बळी गेले आहेत. तेव्हा अकोलेकरांनो, या मार्गावरून जाताना जरा सावधान, असे म्हणायची वेळ आली आहे.

जलवाहिनीचे जाळे टाकणाऱ्या कंपनीसोबत करार झाला असून, यामध्ये रस्ते दुरुस्तीचा समावेश आहे. कंपनी ही जबाबदारी झटकू शकत नाही. अन्यथा कारवाईचा पर्याय खुला आहे.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला