शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीला ठेंग; २० कोटींची गरज असताना मिळाले १.८९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:00 IST

अकोला : पावसाळ्यात खराब होणारे तसेच ठरावीक कालावधीनंतर दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्याचवेळी त्या कामांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्धच न झाल्याने चालू वर्षात दुरुस्तीची कामेच झाली नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असलेल्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाची देखभाल व दुरुस्ती करावी लागते. या कामांसाठी जिल्हा परिषदेने १२ कोटी ७९ लाख रुपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती.

अकोला : पावसाळ्यात खराब होणारे तसेच ठरावीक कालावधीनंतर दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्याचवेळी त्या कामांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्धच न झाल्याने चालू वर्षात दुरुस्तीची कामेच झाली नसल्याची माहिती आहे. या कामांसाठी जिल्हा परिषदेने १२ कोटी ७९ लाख रुपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असलेल्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाची देखभाल व दुरुस्ती करावी लागते. या प्रकारातील नवीन रस्त्यांची निर्मिती करणे, आधी निर्मित रस्त्याची दरवर्षी ठरलेल्या मानकानुसार दुरुस्ती करण्याची कामेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जातात. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला दिला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत रस्ते निर्मिती, दुरुस्तीसाठी दिलेला निधी खर्च करण्यात जिल्हा परिषद अपयशी ठरली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत निधी देताना जिल्हा नियोजन समितीने सातत्याने कपात केली. चालू वर्षात तर १२ कोटी ७९ लाखांची मागणी असताना केवळ १ कोटी ८९ लाख एवढाच निधी समितीकडून मिळाला. त्यामुळे नियोजनानुसार ठरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कशी करावी, हा मोठा प्रश्न जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागापुढे आहे.- ग्रामीण व इतर मार्गांमध्ये ५६९ किमी खराबजिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण भागातील आणि इतर जिल्हा मार्गाच्या एकूण लांबीपैकी २०१७-१८ या वर्षात ५६९ किमी लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. या संपूर्ण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ३६ लाखांची गरज आहे.- ठरल्याप्रमाणे दुरुस्तीची रस्तेदरवर्षी ठरल्याप्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी या दोन्ही प्रकारातील एकूण १४२ किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये ग्रामीण मार्ग ५७ किमी, तर इतर जिल्हा मार्ग ८५ किमी आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी १२ कोटी ७९ लाख निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली; मात्र निधी न मिळाल्याने रस्त्यांची खराब अवस्था कायम आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद