शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्याचे वाटोळे; दोषींना वाचविण्यासाठी मनपाची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:57 IST

अकोला: महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असतानाच दुसरीकडे त्यांचे अधिकारी तिजोरीवर हात साफ करण्याचे धारिष्ट्य दाखवत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट रस्त्यावर ‘पॅचिंग’ची कामेमहापौर कारवाईसाठी आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असतानाच दुसरीकडे त्यांचे अधिकारी तिजोरीवर हात साफ करण्याचे धारिष्ट्य दाखवत असल्याचे चित्र आहे. जुने शहरातील भीम नगर चौक ते महाराष्ट्र टेलर ते शिरसाट यांच्या घरापर्यंत १२ लाख रुपये किमतीतून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे वाटोळे केल्यानंतर दोषींना पाठीशी घालण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने धावाधाव सुरू केली आहे. अत्यंत सुमार दर्जाच्या रस्त्यावर ‘पॅचिंग’ करून दिल्यास उर्वरित देयक अदा करण्याची भूमिका बांधकाम विभागाने घेतल्याने सुज्ञ अकोलेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करत कराच्या रकमेत वाढ केली. शहरातील विकास कामांना चालना मिळणार असल्याने अकोलेकरांनीसुद्धा मनपाच्या निर्णयाचे सर्मथन केले. अर्थातच, अक ोलेकरांच्या खिशातून वसूल होणार्‍या कर रकमेतून मूलभूत सुविधांची कामे निकाली काढल्या जातील. यामध्ये रस्ते, नाल्या, धापे, पथदिवे  यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. ही कामे दज्रेदार होणे अपेक्षित आहे. शिस्तप्रिय, प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या अजय लहाने यांच्या कार्यकाळातही स्थानिक अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार दर्जाहीन कामे करत असल्याचे उघडकीस आले आहे. जुने शहरातील भीम नगर चौक ते महाराष्ट्र टेलर ते सार्वजनिक शौचालयापर्यंत ४२.२0 मीटर लांब व ७ मीटर रुंद सिमेंट रस्त्याचे काम प्रदीप शिरसाट नामक कंत्राटदाराने १ सप्टेंबर २0१६ रोजी सुरू केले. २८ सप्टेंबरपर्यंत रस्ता पूर्ण करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक शौचालय ते संजय शिरसाट यांच्या घरापर्यंत ४२.५५ मीटर लांब रस्त्याचे काम २९ सप्टेंबर रोजी सुरू करून ३0 नोव्हेंबर २0१६ पर्यंत पूर्ण केले. दोन टप्प्यात बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे १२ लाख रुपयांपैकी ६ लाखांचे देयक मनपाच्या बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी अदा केले. सिमेंट रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाले असताना कामावर देखरेख ठेवणारा उपअभियंता सईद अहमद, रस्त्याची अंतिम पाहणी करून अहवाल सादर करणारे कार्यकारी अभियंता अजय गुजर व शहर अभियंता इक्बाल खान यांनी देयक अदा केलेच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अर्थातच, काहींनी देयकाच्या बदल्यात दिवाळी साजरी केल्याचे दिसून येते.

कारवाईत भेदभाव का?प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणार्‍या उमरी परिसरात २२ मीटर लांबीच्या नाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार मनपाला प्राप्त झाल्यानंतर कामावर देखरेख ठेवणारे उपअभियंता कृष्णा वाडेकर यांना निलंबित करण्यासाठी बांधकाम विभाग सरसावला होता. दुसरीकडे १२ लाखांच्या निकृष्ट सिमेंट रस्ता प्रकरणातील उपअभियंता सईद अहमद यांना मात्र तीन महिन्यांचे मानधन कपात करण्याची नोटीस बांधकाम विभागाने जारी केली. हा प्रकार पाहता कारवाईतही प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याचे दिसून आले.

करवाढीच्या निमित्ताने आम्ही अकोलेकरांच्या भावना जाणल्या. निधी कोणताही असो, त्यातून दज्रेदार कामे होणे अपेक्षित आहेत. याप्रकरणी रस्त्याची गुणवत्ता तपासून दोषींवर तातडीने ठोस कारवाई होण्याची गरज आहे. प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी अपेक्षा आहे. - विजय अग्रवाल, महापौर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा