शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जप्त केलेल्या तांदुळाचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:24 IST

अकोला: अन्वी मिर्झापूर येथील एका रेशन माफियाकडून तब्बल दोन ट्रक म्हणजेच १३ लाख रुपयांचा तांदूळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केल्यानंतर पुरवठा विभागाने सदर तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला आहे.

- सचिन राऊत

अकोला: अन्वी मिर्झापूर येथील एका रेशन माफियाकडून तब्बल दोन ट्रक म्हणजेच १३ लाख रुपयांचा तांदूळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केल्यानंतर पुरवठा विभागाने सदर तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला तब्बल १३ लाखांचा तांदूळ आला तरी कोठून, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील एका गोदामात रेशन माफियांनी स्वस्त धान्य दुकान संचालकांमार्फत धान्याची अवैधरीत्या साठवणूक केली असून, तो काळ्या बाजारात विक्री होणार असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी छापा टाकून कारवाई केली. एमएच ३० एल १८६० आणि जीजे ०३ एटी ४१३३ क्रमांकाच्या दोन ट्रकमधील तांदूळ जप्त करण्यात आला. अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी संतोष बाबुलाल जयस्वाल व गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील रहिवासी जयेशभाई मनसुखभाई मकवाना या दोघांवर कारवाईचा प्रस्ताव विशेष पथकाने दिला; मात्र पुरवठा विभागाने हा तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला १३ लाख रुपयांचा तांदूळ साठा आहे तरी कुणाचा आणि तो कोठून आणण्यात आला, हा संशोधनाचा विषय निर्माण झाला आहे.असा आहे अहवाल१३ लाख रुपयांचा तांदूळ शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील पोत्यांमध्ये नसल्यामुळे तो तांदूळ रेशनचा आहे की नाही, हे सांगता येत नाही, असा अहवाल देण्यात आला आहे; मात्र पुरवठा विभागाने तपासणी केल्यास सत्य समोर आले असते; परंतु पुरवठा विभागाने खोलात न जाता सरळ अहवाल देऊन रेशन माफियांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.जीएसटीला दिला खोसदर १३ लाखांचा तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल आल्यामुळे हा तांदूळ कोठून खरेदी-विक्री झाला, याचे देयक अद्याप समोर आले नाही. त्यामुळे सदर तांदुळासंदर्भात संशय निर्माण होत असून, हा तांदूळ रेशनचा नसेल तर ज्या ठिकाणावरून खरेदी-विक्री झाली त्याचे देयक व जीएसटी अद्याप सादर केलेली नसल्याने गौडबंगाल निर्माण झाले आहे. ६० पैसे किलोचा तांदूळ गुजरातमध्ये नेऊन त्याचेच पाकीटबंद पोहे तयार करून हा तांदूळ तब्बल १५ ते १८ रुपये किलोने विकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास पुरवठा विभागाचे साटेलोटे उघड होण्याची शक्यता असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस