शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खदान परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:28 IST

अकोला : खदान परिसरातील कवाडे नगरामध्ये शनिवारी उशिरा रात्री लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.

अकोला : खदान परिसरातील कवाडे नगरामध्ये शनिवारी उशिरा रात्री लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीतील दोन्ही गटांतील ३५ जणांविरुद्ध खदान पोलीस स्टेशमनध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने व पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी सुमारे ३४ ते ३५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.कवाडे नगर येथे लहान मुलाला डोक्याला लागल्याच्या कारणावरून दोन गट अमोरासमोर आले होते. शाब्दिक वादानंतर झालेल्या दोन्ही गटांतील तुंबळ हाणामारीत काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका गटातील जावेद खान युनूस खान रा. नुराणी मशीद खदान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल ढोकणे, रूपेश वानखडे, गौतम मोरे, राजू खंडारे, मिलिंद जाधव, अमोल चोडे, शुभम अडागडे, विजय अडागडे, आकाश वानखडे, कुणाल वानखडे, भारत सुरोसे, विक्की अडागडे, रोहित वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या गटातील विजय अडागडे यांच्या तक्रारीवरून आरोपी साहिल खान एजाज खान, मोहम्मद लाला मोहम्मद जबार, फईम खान आरीफ खान, मोहसीन खान याकुब, मोहम्मद कैफ मोहम्मद इलियास, अतमस खान, जावेदखान युनूसखान, मोहम्मद गणी मोहम्मद अकबर, शेख फैजल शेख, शेख मोहम्मद अन्सार शेख अब्दुल्ला, शाहरूख खान आरीफ खान, शेख रिहान शेख खलील, शेख इम्रान शेख खलील यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३५३, १४७, १४३, १४८, ३२४, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीमुळे खदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींची धरपकड सुरू असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी