शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांपर्यंत दंड करण्याचे अधिकार तलाठय़ांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:00 IST

बोरगाव वैराळे : लिलाव न झालेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांना  कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये दंड करण्याचे अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याविषयी ३0 जानेवारी रोजी शासनाने परिपत्रक काढले आहे. 

ठळक मुद्देअवैध वाळू वाहतूक प्रकरणी शासनाने काढले नवीन परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : लिलाव न झालेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांना  कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये दंड करण्याचे अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याविषयी ३0 जानेवारी रोजी शासनाने परिपत्रक काढले आहे.  बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हाता, नागद, सागद, मोखा यासह जिल्ह्यातील सात तालुक्यातील बरेचसे वाळू घाट लिलावात काढण्यात आले नाहीत. तरीही या लिलाव न झालेल्या वाळू घाटातून दररोज रात्रीच्या वेळी हजारो ब्रॉस वाळूचे उत्खनन वाळू माफिया करीत आहेत. त्यामुळे, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. १२ जानेवारी रोजी महसूल व वन विभाग यांनी अधिसूचना क्रमांक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये दुरूस्ती करून नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार वाळू काढण्यासाठी ड्रिल मशीन वापरल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच ट्रॅक्टर, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पम्प यांचा वापर अवैधरीत्या वाळू वाहतूक करण्यासाठी केल्यास एक लाख रुपये दंड करण्याची तरतूद केली आहे. तसेच फूल बॉडी ट्रक, डंपर, कप्रेशर मशीन वाळू गोळा करणे वाहतूक करण्यासाठी वापरल्यास दोन लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच बार्ज , मोटराईट बोट यांचा केल्यास पाच लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. एक्स मॅकेनाइन्ड व लोडरचा वापर वाळू गोळा करणे व वाहतूक करण्यासाठी केल्यास साडेसात लाख रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दंड आकारण्याचा अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत.

शासनाने काढलेले नवीन परिपत्रक सर्वच पटवारी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांवर व अवैधरीत्या वाळू उत्खनन करणे, गोळा करणार्‍यांवर कारवाई करून दंड करण्याचा आदेश दिला आहे. महसूल विभागाकडून शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल - दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण