शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

चांगल्यासाठी बक्षीस अन् चुकीला शासन - चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:23 IST

चांगले काम केले, तर बक्षीस अन् चुकीचे काम केले तर शासन आहे. या  भाषेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांशी  संवाद साधला. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम  अधिकार्‍यांकडून खड्डेमुक्त अभियानात विकास कामांचा त्यांनी आढावा घे तला.

ठळक मुद्देपश्‍चिम वर्‍हाडातील बांधकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  स्वत:चे घर बांधताना, जशी कौटुंबिक काळजी आपण घेतो.  त्याच्या चांगल्या-वाईटची जबाबदारी आपण स्वीकारतो, त्याच पद्धतीने  काळजी सार्वजनिक बांधकाम विभागातील मार्ग, इमारती आणि ब्रीज बांधताना  घ्या. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जाणीव ओळखून काम करा.  चांगले काम केले, तर बक्षीस अन् चुकीचे काम केले तर शासन आहे. या  भाषेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांशी  संवाद साधला. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम  अधिकार्‍यांकडून खड्डेमुक्त अभियानात विकास कामांचा त्यांनी आढावा घे तला. रविवारी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्य़ा मुद्यावर संवाद  साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या सभेच्या  मंचावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, महा पौर विजय अग्रवाल, खा. संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर  सावरकर, प्रकाश भारसाकळे, आकाश फुंडकर, अकोला मंडळाचे कार्यकारी  अभियंता गिरीश जोशी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तसेच उ पजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वजनिक  बांधकाम मंडळातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील कामांचा पावर  पाइंट प्रेझण्टेशनद्वारे आढावा घेतला. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी खड्डेमुक्त  अभियानात काय केले, याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष संवादातून घेतली. तिन्ही जिल्ह्यातील स्ट्रक्चर ऑडिटचा गोषवारा येथे दिला गेला. पूर्वीच्या  निविदा आणि आता निविदा प्रक्रियेत बदल केल्याने १४00 ऐवजी केवळ ४२  निविदा काढाव्या लागल्याची जमेची बाजूही पाटील यांनी येथे व्यक्त केली.  सार्वजनिक बांधकाम विभागात निर्माण होणार्‍या कोर्ट केसेस सांभाळण्यासाठी  लॉ ऑफीसर किंवा जनसंपर्क अधिकार्‍यांची आवश्यकता असल्याची मागणी  येथे अभियंत्यांकडून झाली. कार्यकारी अभियंत्यांची वेळ या कामात व्यर्थ होत  असल्याचे सांगितले गेले. अकोल्यातील विकास कामांमध्ये न्यायालयीन इमार त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्यानगृह, मुलांचे-मुलींचे वस ितगृह, जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे बांधकाम दाखविले गेलेत. गांधीग्राम येथील नव्याने बांधलेला अद्ययावत पूल लवकरच सर्मपित होणार  असल्याची माहितीही येथे दिली गेली. डाबकी रेल्वे पूलचे बांधकाम युद्ध स् तरावर सुरू असल्याची माहितीही येथे दिली गेली. इतर जिल्ह्यातील मार्ग  आणि राज्य महामार्गांचे बांधकाम सुरू असल्याचेही येथे सांगितले गेले.अकोला-अकोट, अकोट-अंजनगाव सुर्जी आणि अंजनगाव सुर्जी- मध्य  प्रदेश जोडणार्‍या राज्य महामार्गाचे काम तीन टप्प्यात असून, त्या कामाला १५  दिवसांत गती मिळेल, असेही येथे सांगितले गेले. सरतेशेवटी राष्ट्रीय महामार्ग  अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांनी थोडक्यात त्यांच्या  विभागाची माहिती दिली. सभेचे संचालन मंडळाचे अधीक्षक अभियंता गिरीश  जोशी यांनी, तर आभार विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौव्हान यांनी  केले. 

लवकरच मेगा भरती मनुष्यबळाची कमतरता हा विषय संपूर्ण राज्याचा आहे. लवकरच सार्वजनिक  बांधकाम विभागात मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्यातून सर्व विभागातील  प्रश्न सुटतील, असेही चंद्रकात पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAkola cityअकोला शहर