शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 02:04 IST

शेतक-यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे!

अकोला, दि. १७- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घेऊन, ग्रामीण भागातील शेतकरी-शेतमजुरांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.देशातील कृषी अर्थव्यवस्था मुख्यत: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात जिल्हा सहकारी बँकेच्या शाखांचे जाळे पसरले असून, जिल्हा सहकारी बँकांच्या शाखांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे खाते मोठय़ा प्रमाणावर आहेत; परंतु ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ५00 व १000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ५00 व १000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करणार्‍या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या सोयाबीन व कापूस पिकाचा हंगाम सुरू असून, उत्पादित मालाची विक्री केल्यानंतर नोटा बँकेत जमा करण्यासाठी १५ ते २0 किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीयीकृत बँकेत जाणे व नोटा बदलून घेणे, शेतकर्‍यांसाठी कठीण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्हा, तालुका स्तरावर तसेच मोठय़ा लोकसंख्येच्या गावात शाखा असल्याने, शेतकर्‍यांना शेतीची कामे सोडून नोटा बदलून घेण्याकरिता दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे मिळतीलच, याबाबतची खात्री नाही. रब्बी पीक पेरणीचा हंगाम सुरू असून, नोटा बदलण्यासाठी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेरणीचा खोळंबा निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा बँकांतील नोटाबंदीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५00 व १000 रुपयांच्या स्वीकारण्याची बंदी मागे घेऊन, शेतकरी व शेतमजुरांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यासंबंधीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. सुभाषचंद्र कोरपे, नीळकंठ खेडकर, देवराव पाटील हागे, प्रल्हाद ढोरे, ज्ञानेश्‍वर महल्ले, प्रकाश काळे, सचिन वाकोडे, रामेश्‍वर वाघमारे, बळीराम कपले यांच्यासह बाजार समितीचे संचालक, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व शेतकरी सहभागी झाले होते.