शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतन देयकांची फेरतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:56 IST

सातही पंचायत समित्यांमध्ये वेतन देयकांची पडताळणी करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन मिळण्यास कमालीचा विलंब होत असल्याने याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचायत समिती स्तरावरून आढावा घेत वेतन तातडीने अदा करण्यासाठी सूचना दिल्या. त्याचवेळी बाळापूर पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या वेतन देयकाच्या पडताळणी अतिरिक्त रक्कम अदा होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे सातही पंचायत समित्यांमध्ये वेतन देयकांची पडताळणी करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावले.जिल्ह्यातील शिक्षक, ग्रामसेवकांच्या वेतनाला कमालीचा विलंब होत असून, संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा फटका या दोन्ही संवर्गाला बसत आहे. त्यामुळे या संवर्गात प्रचंड नाराजी पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचायत समिती स्तरावरून माहिती घेतली. यावेळी बाळापूर पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी साखरकर यांनी वेतन देयकाची सेवापुस्तकातील नोंदीनुसार तपासणी केली जात आहे. त्यामध्ये ५० शिक्षकांच्या वेतन देयकात ८० हजार रुपयांपर्यंतची रक्कम अतिरिक्त अदा होण्याची शक्यता असल्याचे पुढे आले.संभाव्य आर्थिक अपहार रोखण्यासाठी सर्व सेवापुस्तकानुसार वेतन देयक तपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी साखरकर यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच इतरही पंचायत समितीमध्ये हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करूनच देयकाला मंजुरी देण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

दोन महिन्यांपासून वेतन नाही!शिक्षकांचा जून महिन्याचा पगार आजपर्यंतही झालेला नाही. शिक्षण विभाग, अर्थ विभागातील अधिकारी-कर्मचाºयांच्या बेपर्वाईचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना सहन करावा लागत आहे. वेतन देयकात अधिकाºयाच्या स्वाक्षरी नसणे, देयक कोषागारात जमा केल्यानंतर सर्व्हर डाउन आहे. सीएमपी आली नाही, या कारणांमुळे वेतनाला विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षकांना भुर्दंडमुलांच्या शाळांची फी, कुटुंबातील लग्नकार्य, खर्च प्रचंड असताना शिक्षकांना वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक, शैक्षणिक, वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या काळजीनेही शिक्षकांची झोप उडाली आहे. वेतनाच्या अनियमिततेमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य नाही. जादा व्याजाचा भुर्दंडही शिक्षकांना भरावा लागत आहे.

आमदारांनीही घेतली बैठकवेतनाला विलंब होत असल्याच्या कारणावरून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनीही शिक्षकांची ही समस्या निकाली काढण्याच्या मुद्यांवर गुरुवारी बैठक घेत निर्देश दिले.

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोलाTeacherशिक्षक