शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवांनी घेतला आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:28 IST

अकोला :  बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यासाठी तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याबाबत बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना. त्रिपाठी यांनी मंगळवारी जिल्हय़ातील विविध यंत्रणांकडून आढावा घेतला.

ठळक मुद्दे‘आरटीई’ची अंमलबजावणी होत नसल्याचा विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यासाठी तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याबाबत बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना. त्रिपाठी यांनी मंगळवारी जिल्हय़ातील विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जात नसल्याच्या मुद्याबाबत त्यांनी संबंधितांना विचारणा केली. पॉस्को, शिक्षण हक्क कायदा, ज्युवेनाइल जस्टिस अँक्ट कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी विविध यंत्रणांकडून घेतली. उद्या बुलडाणा जिल्हय़ासाठी ते रवाना होत आहेत. शासनाच्या बालहक्क संरक्षण आयोगाकडून बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. त्यासाठी बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना. त्रिपाठी यांनी जिल्हय़ाची आढावा बैठक घेतली. जिल्हय़ातील पॉस्को कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, त्यामध्ये तपास करणारे पोलीस अधिकारी, शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदी, त्यानुसार शाळांमध्ये होत असलेली प्रवेश पद्धती, विद्यार्थ्यांच्या हक्काचे रक्षण करणारे शिक्षण विभागातील अधिकारी, तसेच कामगार अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, सदस्य, ज्युवेनाइल जस्टिस बोर्डचे अध्यक्ष, सदस्य तसेच या क्षेत्रातील संबंधित अधिकार्‍यांकडून त्यांनी आढावा घेतला. दुपारनंतर बालगृह, आश्रमशाळांची पाहणी करण्यासाठी त्यांनी बाश्रीटाकळी तालुक्यातील गावांमध्ये दौरा केला. आढाव्यातील संपूर्ण माहितीनुसार बालहक्क संरक्षण आयोगाकडून पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर