शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी अर्जांचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:15 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन कार्यक्रमात करण्यात आली असून,  पडताळणीतील माहितीची उजळणी तालुका स्तरावर करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम वेगात अकोला, बाळापूर, पातूर तालुक्यातील कामाचा आढावा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन कार्यक्रमात करण्यात आली असून,  पडताळणीतील माहितीची उजळणी तालुका स्तरावर करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.  त्यानंतर जिल्ह्यात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीच्या अर्जांतील माहितीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीतील माहितीच्या आधारे कर्जमाफीच्या अर्जांची उजळणी जिल्ह्यातील तालुका स्तरावर करण्यात येत असून, त्यामध्ये थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे.

अकोला, बाळापूर, पातूर तालुक्यातील कामाचा आढावा !कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यात कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन, त्यामध्ये घेण्यात आलेली माहिती आणि थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांच्यासह संबंधित सहायक निबंधक (सहकारी संस्था) व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.कर्जमाफी योजनेंतर्गत ऑनलाइन भरलेल्या अर्जांच्या चावडी वाचनानंतर शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यामध्ये पातूर व बाळापूर तालुक्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, अकोला तालुक्यातील शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम अद्याप अपूर्ण असून, ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती