शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारींचा सात दिवसांच्या आत आढावा घ्यावा - डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:41 IST

अकोला:  सर्व विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा  सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगतानाच, सर्व विभागप्रमुखांनी जनता दरबारात स्वत: उपस्थित राहण्याचे  निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी  दिले.

ठळक मुद्दे१५ जानेवारी रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १०४ तक्रारी प्राप्त झाल्या.  नवीन तक्रारकर्त्यांना १५ दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल.तक्रार प्राप्त झाल्यानंतर  पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे.

अकोला:  सर्व विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा  सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगतानाच, सर्व विभागप्रमुखांनी जनता दरबारात स्वत: उपस्थित राहण्याचे  निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी  दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  आयोजित जनता दराबारात ते बोलत होते. सोमवार,  १५ जानेवारी रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १०४ तक्रारी प्राप्त झाल्या.             यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,  मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींसह विविध विभागाचे  विभागप्रमुख उपस्थित होते.            असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की,  व्यक्तीगत लाभाच्या योजनासह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच  यावषीर्चा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे  सर्व माहिती विभागप्रमुखांनी  बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले. जनता दरबारापुर्वी एका खात्याचा आढावा  घेण्यात येईल. पुढील जनता दरबारा पुर्वी जिल्हा परिषदेतील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे तरी  संबंधीत जिल्हा परिषदतील संबंधीत विभागाच्या  विविध अधिका-यांनी आपल्या विभागाची परिपुर्ण माहिती  बैठकीत येतांना सोबत आणावी. या जनता दराबारात काही विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित नसल्यामुळे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी  नाराजी व्यक्त केली. पुढील जनता दरबारात  विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे असे निर्देश देवून  पालकमंत्री पुढे म्हणाले की,  केवळ अपवादात्मक परिस्थीतीतच वरिष्ठ अधिका-यांची परवानगी घेवूनच प्रतिनीधी पाठवावा असेही त्यांनी सांगितले.

 नवीन तक्रारकर्त्यांना १५ दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार कर्त्यांना दिला.  प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिका?्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर  पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची  प्राथमिक माहिती घेवूनच  अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे,  असेही ते म्हणाले.

            सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुखांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या पुढेही नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी.  तक्रार घेवून आलेल्या नागरिकांची निराशा होता कामा नये. याकडे विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात.

पालकमंत्री कार्यालयाच्या वतीने  जनता दरबाराच्या  नियोजनाची जबाबदारी पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे हे पार  पाडतात. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर , राजेश खवले, अकोल्याचे उप विभागीय अधिकारी  संजय खडसे, उपविभागीय अधिकारी  अभयसिंह मोहिते,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे  यांचेसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय