शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आमदार सावरकर यांच्या उपस्थितीत ‘अमृत’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:01 IST

अकोला: शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी जलवाहिनीच्या मुद्यावरून सभागृहात गोंधळ घालताच सायंकाळी महापालिकेत बैठकांचे सत्र दिसून आले.

अकोला: शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी जलवाहिनीच्या मुद्यावरून सभागृहात गोंधळ घालताच सायंकाळी महापालिकेत बैठकांचे सत्र दिसून आले. महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत ‘अमृत’ योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस व नगरसेवक उपस्थित होते.जलवाहिनीचे जाळे टाकणाऱ्या एजन्सीकडून शहरात कालबाह्य पाइप वापरण्यात आल्याच्या मुद्यावरून शिवसेनेने सभागृह डोक्यावर घेतले, तसेच जोपर्यंत शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होत नाही, तोपर्यंत एजन्सीचे देयक अदा न करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी लावून धरली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी ‘अमृत’चा आढावा घेण्यासाठी मनपा, मजीप्रा व संबंधित एजन्सीची तातडीने बैठक बोलावली. जलवाहिनीच्या कामाला विलंब होत असल्याचा पाढा या बैठकीत नगरसेवकांनी वाचला. अनेक ठिकाणी खोदकाम केल्यानंतर रस्ता दुरुस्ती करण्यात आली नसून, मुख्य रस्त्यांलगत खोदलेले खड्डे वाहनधारकांच्या जीवावर उठले आहेत. जुनी पाइपलाइन काढल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याला जाणीवपूर्वक विलंब होत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, अधिकृत नळधारकांना नवीन जलवाहिनीवरून नळ कनेक्शन देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली जात असल्याच्या मुद्यावर चर्चा झाली. अधिकृत नळ जोडणी असेल तर संबंधित नागरिकांना मोफत नळ जोडणी देण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. जलवाहिनीच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्राची असली तरी संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष व हलगर्जीपणा होत असण्याच्या मुद्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली.३ कोटी ३६ लाखांच्या देयकाला मंजुरी?मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी आयएस मानांकनाच्या पाइपच्या मुद्यावरून एपी अ‍ॅण्ड जीपी एजन्सीचे ३ कोटी ३६ लाख रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शासनाचे मार्गदर्शन मागितले होते. मनपात सायंकाळी पार पडलेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा या देयकाला मंजुरी देण्यात आल्याची शहरात चर्चा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाRandhir Savarkarरणधीर सावरकर