शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पाेलिस दलात उलटफेर; पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या

By आशीष गावंडे | Updated: September 4, 2024 20:45 IST

पाेलिसांच्या कामकाजावर पाेलिस अधीक्षकांची करडी नजर

आशिष गावंडे, अकाेला: मागील अनेक दिवसांपासून जिल्हा पाेलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे भिजत घाेंगडे कायम हाेते. अखेर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ३ सप्टेंबर राेजी विविध पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यांवर शिक्कामाेर्तब केले. अर्थातच,सणासुदीचे दिवस व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर पाेलिसांच्या कामकाजावर पाेलिस अधीक्षक सिंह यांची करडी नजर असल्याचे बाेलल्या जात आहे. 

लाेकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या हाेत्या. तेव्हापासून ते आजतागायत बदल्यांचे सत्र सुरु आहे. मध्यंतरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक व पाेलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या हाेत्या. परंतु राज्य निवडणूक आयाेगाने गृहविभागाला २० ऑगस्ट पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यामुळे जिल्हास्तरावरील बदल्यांना जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तात्पुरता ‘ब्रेक’लावला हाेता. अखेर सप्टेंबर महिन्यात बदलीच्या मुद्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. यामध्ये बाेरगाव मंजू येथील पाेलिस निरीक्षक मनाेज केदारे यांची खदान पाेलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बाेरगाव येथे पाेलिस निरीक्षक पदी अनिल गाेपाळ, डाबकी राेड पाेलिस स्टेशनमध्ये धर्मा साेनुने , बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात प्रकाश तुनकलवार, पाेलिस निरीक्षक तपन काेल्हे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा विभागात,अकाेटफैल पाेलिस ठाण्यातून सहायक पाेलिस निरीक्षक गजानन राठाेड यांची बदली हिवरखेड पाेलिस ठाणे,खदान पाेलिस ठाण्यातील सहाय्यक पाेलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांची मुर्तिजापूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात, पाेलिस नियंत्रण कक्षातील सहायक पाेलिस निरीक्षक अमाेल बारापात्रे यांची अकाेटफैल पाेलिस स्टेशनमध्ये दुय्यम अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ह्यांची परजिल्ह्यात बदली

खदान पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक किशाेर शेळके वाशिम, हिवरखेडचे सहायक पाेलिस निरीक्षक गाेविंद पांडव यवतमाळ, मुर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार कैलाश भगत यवतमाळ, मुर्तिजापूर पाेलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे बुलढाणा, बार्शीटाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे यांची बुलढाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली. केदारे यांच्यासमाेर आव्हानांचा डाेंगर

खदान पाेलिस स्टेशनमध्ये बुधवारी मनाेज केदारे यांनी पदभार स्वीकारला. या पाेलिस ठाण्यातील गुन्हे शाेध पथकातील काही कर्मचाऱ्यांमुळे पाेलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळेच मध्यंतरी जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी ‘डीबी स्काॅड’ बरखास्त केले हाेते. अंमलदारांचा पायपाेस नाही. स्टेशन डायरीवर कर्तव्य बजावणारे कर्मचारी जाणीवपूर्वक भ्रमणध्वनी बंद करुन ठेवून कर्तव्यापासून पळ काढतात. अनेक प्रकरणांचा काही पाेलिस कर्मचारी पाेलिस ठाण्याच्या बाहेरच निपटारा करतात. यासर्व बाबी व खदान पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पाेलिस निरीक्षक केदारे यांच्यासमाेर आव्हान असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Policeपोलिस