शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानवृत्तांचे पेन्शन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 20:50 IST

विविध आस्थापनांमधून सेवानवृत्त झाल्यानंतर ईपीएस ९५ अंतर्गत  सेवानवृत्ती वेतन घेणार्‍या अनेक नवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडले आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्मचारी नवृत्ती वेतन योजना समन्वय समितीद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देईपीएस ९५ योजना दिवाळीपूर्वी रक्कम जमा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध आस्थापनांमधून सेवानवृत्त झाल्यानंतर ईपीएस ९५ अंतर्गत  सेवानवृत्ती वेतन घेणार्‍या अनेक नवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडले आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्मचारी नवृत्ती वेतन योजना समन्वय समितीद्वारे करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या आयुक्तांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, अकोला अंतर्गत अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ असे पाच जिल्हय़ांचा अंतर्भाव होतो. या पाचही जिल्हय़ातील ईपीएस ९५ योजनेंतर्गत शेकडो सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडलेले आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आल्यानंतर अनेक सेवानवृत्त कर्मचार्‍यांनी तशी दुरुस्तीही करून दिली. अधिकार्‍यांची भेट घेतली असता, लवकरच खात्यात पैसे जमा होतील,असे आश्‍वासन देण्यात आले; परंतु अद्यापपर्यंत पेन्शनची रक्कम जमा झाली नाही. यवतमाळ जिल्हय़ातील दिग्रस तालुक्यातील ७0 ते ८0 ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन रखडलेले असल्यामुळे त्यांनी अकोला येथील कार्यालयात अनेक चकरा मारल्या; परंतु फायदा झाला नाही. आता दिवाळी तोंडावर आली असताना सहानुभूतीपूर्वक विचार करून पेन्शनची रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.