शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

औषधांसाठी किरकोळ विक्रेत्यांची नागपूरकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:49 IST

काही किरकोळ औषध विक्रेत्यांनी नागपूर येथून दवाबाजारातून औषधी आणण्यासाठी धाव घेणे सुरू केले आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूंना रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे; मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली असून, यामध्ये औषध व्यावसायिकांची मोठी भूमिका आहे. दवा बाजार तसेच ठोक औषध विक्रेत्यांकडे आतापर्यंत असलेला साठा संपत आल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही औषधाचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे काही किरकोळ औषध विक्रेत्यांनी नागपूर येथून दवाबाजारातून औषधी आणण्यासाठी धाव घेणे सुरू केले आहे.जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना दवा बाजार तसेच इतर ठोक औषधी विक्रेत्यांकडून औषधांचा साठा पुरविण्यात येतो. विविध कंपन्यांच्या औषधांच्या डिलरशीपही अकोल्यात असल्याने त्यांच्या औषधी ट्रकनेच अकोल्यात आणण्यात येतात; मात्र कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बहुतांश कंपन्यांना वाहतूक करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या कंपन्यांचा औषधांचा साठा आता अकोल्यापर्यंत येत नसल्याने किरकोळ औषध विक्रेत्यांना बहुतांश महत्त्वाची औषधी मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी औषधांचा साठा आणण्यासाठी नागपूर येथे धाव घेतली आहे. अकोला शहरातील बहुतांश मोठ्या औषध दुकानांचे संचालक नागपूर येथून कारने औषधी आणत असून, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना घेण्यात येत आहे. त्यांनी परवाना दिलेल्या वाहनांमधूनच अकोल्यात औषधी आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

हा औषधसाठा आणण्याचा प्रयत्नशहरातील औषध विक्रेते नागपूर येथील दवा बाजारातून एन ९५ मास्क, दोन पदरी तसेच तीन पदरी मास्क, हॅन्ड वॉश, हॅन्ड सॅनिटायझर, रक्तदाबाची औषधी, मधुमेहाची औषधी तसेच जळीत रुग्णांसह हृदयरुग्णांच्या औषधी आणण्यासाठी आटापिटा करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश औषधी विक्रेते आता नागपूर येथून औषधांचा साठा आणत असल्याने अकोलेकरांना चिंतेची गरज नसल्याची माहिती आहे.

वाहतूक खोळंबल्याने अडचणीऔषधांचा पुरवठा करणाऱ्या बहुतांश राज्यातील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाहेर राज्यातील वाहने औषध घेऊन आल्यानंतर परत जाण्यास त्यांना अडचणी येत असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे बºयाच कंपन्यांचा औषध साठा अकोल्यात येत नसल्यामुळे आता किरकोळ औषध विक्रेत्यांनी कारनेच औषध आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmedicineऔषधं