शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

राज्यात १0 लाखांच्यावर तंट्यांचा लागला निकाल

By admin | Updated: November 15, 2014 23:52 IST

तंटामुक्त अभियानाला ग्रामस्थांचा प्रतिसाद.

डॉ. किरण वाघमारे/अकोलाराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला संपूर्ण राज्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विविध स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात गावांमधील तंटामुक्त समित्यांना यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्यांचे असून, महसुली तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. सामोपचाराने तंटे मिटल्यामुळे न्यायालयाचा भार कमी झाला आहे. गावांमधील तंटे गावातच निकाली निघावे, या उद्देशाने २00७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राज्य शासनाने सुरू केली. या उपक्रमाला गावागावांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळाला. गावांमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या. या समित्यांना न्यायालयाच्या धर्तीवर न्याय निवाडा करण्याचे अधिकार देण्यात आले. जवळपास १५0 गुन्ह्यांवर न्याय देण्याचा अधिकार समितीला प्राप्त झाला. फौजदारी स्वरूपातील गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्ह्यांवर न्यायनिवडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समित्यांना मिळाला. त्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची पाळीच अनेक गावकर्‍यांवर आली नाही. तंटामुक्त मोहिमेला ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभल्यामुळेच आतापर्यंंत वेगवेगळ्या स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक तंटे हे फौजदारी स्वरूपाचे आहेत. फौजदारी स्वरूपातील गुन्ह्यात न्यायनिवाडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसला, तरी फौजदारी गुन्हे होऊच नये, या दृष्टीने तंटामुक्त समितीने खबरदारी घेतली. समि तीने फौजदारी तंटे सामोपचाराने गावातल्या गावातच मिटविले आणि न्यायालयाचा वेळ वाचविला. यातून ग्रामस्थांचा पैसा आणि वेळदेखील वाचला. तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी २00७-0८ मध्ये २ लाख ५ हजार ११५ तंटे मिटविण्यात आले. पुढील वर्षी २00८-0९ मध्ये २ लाख १८ हजार ८१३ , २00९-१0 मध्ये २ लाख २५ हजार ३0२ तंटे व त्यानंतरच्या काळात १ लाखापेक्षा जास्त फौजदारी तंटे मिटविण्यात आले. याच कालावधीत दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटविण्यात आले. यात पहिल्या वर्षी २0६६३, दुसर्‍या वर्षी १0२२५, तिसर्‍या वर्षी १४६९९ तर चौथ्या वर्षी १६८५७ तंटे मिटविण्यात आले. महसुली स्वरूपाचे ३३ हजार ३९९ तंटे मिटविण्यात समि त्यांना यश आले.