शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिका-यानेच केली स्वच्छता, सफाई कामगार स्वच्छता करीत नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:07 IST

स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

डोणगांव : स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. याठिकाणी सफाई कामगारही वेळेवर आले नाही; परंतू त्यांची वाट न बघता ग्रामविकास अधिका-यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमामुळे ग्रामपंचायतचे चित्र बदलले आहे.   महाराष्ट्र शासन जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्चून स्वच्छता अभियान राबवित असतानाच डोणगांवमध्ये ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महिलांनी ग्रामपंचायत गाठून समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच जुबेरखान, सदस्य साबीरभाई, कासम बागवान यांच्यासह आठवडी बाजार वार्ड नं.सहा ची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना अस्वच्छता आढळून आली. यावर ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामपंचायतचे कर्मचारी व कचरा गाडी बोलावून घेतली सफाई कामगार न आल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई कामगारांची भूमिका बजावली. ग्रामविकास अधिकाºयांनी रस्त्यावरील घाण उचलून गाडीत टाकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परमाळे, जीवन खडसे, श्याम खोटे, सचिन पहाडे सह कासम बागवान यांनीही ग्रामविकास अधिका-यास सहाय्य केले.  त्यानंतर कोणीही रस्त्यावर घाण टाकू नका व स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी गावक-यांना केले. आठवडी बाजारात रस्त्यावर बसून अनेक व्यापा-यांनी अतिक्रमण केल्याने अडथळा निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी स्वत: कर्मचा-यासह जाऊन अडथळ्याचे अतिक्रमण काढून रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाई केल्या जाईल, अशी सुचनाही रस्त्यावर बसणा-यांना केल्या. त्यामुळे अचानक मरगळ आलेल्या ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकाºयाने केलेल्या कामामुळे हुरुप आल्याचे दिसून येत आहे.

अन्यथा सफाई कामगारांवर कारवाईडोणगाव आठवडी बाजार व प्रत्येक वार्डात सफाई कामगाराच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता निर्माण झाल्याने आपण सफाई कामगारांना नोटीस दिल्या असून दोन दिवसात सफाई कामगारांनी सफाई न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक बुरकुल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला