शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छा निधी खर्चावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:10 IST

अकोला : जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात येणाऱ्या दिनांकाच्या तीन महिन्यांपूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करणे, घोषणा करणे, आश्वासन दिलेले काम सुरू करण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मुदत २९ डिसेंबर २०१८ तर पंचायत समितीची २७ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात येत आहे.लोकप्रतिनिधींना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही.

अकोला : जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात येणाऱ्या दिनांकाच्या तीन महिन्यांपूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करणे, घोषणा करणे, आश्वासन दिलेले काम सुरू करण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा परिषदेसह सर्वच लोकप्रतिनिधींना तसे पत्र शुक्रवारी दिले. या काळात अधिकाºयांनी कामाबाबतचे आदेश दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.जिल्हा परिषदेची मुदत २९ डिसेंबर २०१८ तर पंचायत समितीची २७ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात येत आहे. या काळात राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. आयोगाने ५ आॅक्टोबर २०१६ रोजी त्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीमध्ये संबंधित स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून यापैकी जे अगोदर घडेल, त्या दिनांकापासून कोणत्याही लोकप्रतिनिधींना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी जिल्हा परिषदेची मुदत तीन महिन्यांत संपुष्टात येत आहे. त्या कारणाने आयोगाचे निर्देश पाळणे बंधनकारक आहे. त्याचा आधार घेत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जिल्हा परिषदेसह जिल्हा नियोजन अधिकाºयांना पत्र देत निर्देश पाळण्याचे बजावले आहे. अधिकाºयांना आयोगाचे निर्देश न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचेही बजावले आहे. असे आहेत निर्बंध

  • २७ सप्टेंबरनंतर कोणत्याही (मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार) जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधीस अकोला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही.
  • स्वेच्छा निधीतून कोणत्याही कामाचे आश्वासन देता येणार नाही. कामाच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव अधिकाºयांकडे सादर करू नये.
  • स्वेच्छा निधीतून काम मंजूर करणाºया, कार्यारंभ आदेश देणाºया किंवा प्रत्यक्ष काम करणाºया अधिकाºयांनी प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, २७ सप्टेंबरपूर्वी काम मंजूर असेल, पण प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसेल, तर कार्यारंभ आदेश देऊ नये. त्याआधीच काम सुरू झाले असेल तर ते सुरू ठेवता येईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूकAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय