शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'कंटेनमेंट झोन'साठी निर्बंध; दूध, किराणा, औषध विक्रेत्यांना बाहेर निघण्यास मनाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:46 IST

अकोला : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहून तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याची ...

अकोला: शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहून तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याची बाब लक्षात घेता या भागातील दूध, किराणा तसेच औषध विक्रेत्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या झोनमधील नागरिकांना नाकाबंदी केलेल्या प्रवेशद्वारापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दिला जाणार आहे. या नियोजनासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. प्रभाग क्रमांक ११ चा संपूर्ण परिसर, प्रभाग क्रमांक दोनमधील अकोटफैल परिसर तसेच जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट आदी भागात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी १३ मे रोजी शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना वारंवार सूचना करूनही ते घराबाहेर निघत असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने पालकमंत्र्यांना देण्यात आली. नाकाबंदीवर तैनात केलेल्या पोलिसांची नजर चुकवून नागरिक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जात असल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कोरोना विषाणूला प्रतिबंध घालणे शक्य होणार नसल्याचे पालकमंत्र्यांसह प्रशासकीय यंत्रणांच्या लक्षात आले. त्यावर कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना तसेच दूध, किराणा व औषध विक्रेत्यांना झोनच्या बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी महापालिका प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांची गैरसोय टाळता यावी तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, याकरिता महापालिकेच्या स्तरावर नियोजन केल्या जात असल्याची माहिती आहे.

प्रवेशद्वारापर्यंत उपलब्ध होतील जीवनावश्यक वस्तूमनपाने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा व्यावसायिक, दूध विक्रेता तसेच औषध विक्रेत्यांना साहित्याची गरज भासल्यास त्यांना कंटेनमेंट झोनबाहेरील परिचित व्यावसायिकाला संपर्क साधावा लागेल. संबंधित व्यावसायिक नाकाबंदी केलेल्या प्रवेशद्वारापर्यंत जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा उपलब्ध करून देतील. त्या ठिकाणी येऊन झोनमधील व्यावसायिकाला त्याचे साहित्य घेऊन जावे लागणार आहे.प्रशासनाच्या प्रयोगाकडे लक्षयापूर्वी महापालिकेने बैदपुरा भागात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ओळखपत्र दिले होते. नाकाबंदीवर तैनात केलेल्या पोलिसांना संबंधित ओळखपत्र दाखवून प्रतिबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांना शहरातून जीवनावश्यक साहित्याची खरेदी करणे सहज शक्य झाले होते; परंतु या भागातील नागरिकांच्या मनमानी कारभारामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून प्रशासनावर असा प्रयोग करण्याची वेळ ओढवली आहे. यावर प्रतिबंधित क्षेत्रातील सुज्ञ नागरिकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या