शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विटांसाठी ‘फ्लाय अ‍ॅश’ वापराचे निर्बंध ३०० वरून १०० किमीवर येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 10:44 IST

मातीच्या वीटभट्टीला बंदीची अट १०० किमी परिघापर्यंतच ठेवण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

अकोला : भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन रोखण्यासाठी वीटभट्ट्यांमध्ये औष्णिक वीज केंद्रातील फ्लाय अ‍ॅश वापरली जावी, त्यासाठी वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याच्या अधिसूचनेचे प्रारूप गतवर्षी प्रसिद्ध झाले. त्याची मुदत २५ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आल्याने तसेच याबाबत देशभरातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्राप्त हजारो आक्षेपांनुसार मातीच्या वीटभट्टीला बंदीची अट १०० किमी परिघापर्यंतच ठेवण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. त्याबाबतची अधिसूचना येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यासाठी वीटभट्ट्यांमध्ये कोळसा किंवा लिग्नाइटवर आधारित औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी फ्लाय अ‍ॅश वापरण्याचे बंधन घातले. त्या अधिसूचनेमध्ये संशोधन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसांत संबंधितांकडून आक्षेपही मागविण्यात आले. तसेच एक वर्षाच्या मुदतीनंतर या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचेही नमूद करण्यात आले. त्यामुळे देशभरातील वीटभट्टी मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, अधिसूचनेच्या प्रारूपासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात २४ फेब्रुवारी रोजी बैठक झाली. त्यामध्ये मातीच्या उत्खननाला वीज केंद्राच्या ३०० ऐवजी १०० किमी परिघात बंदीचा निर्णय मान्य करण्यात आला. तसा बदल अधिसूचनेत करून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.अमरावती विभागात पारस, नागपूर विभागात कोराडी, मौदा, चंद्रपूर येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. या सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या ३०० किमी परिघात संपूर्ण विदर्भाचा विस्तार आहे. त्या केंद्रांच्या ३०० किमी परिघात संपूर्ण विदर्भ येत असल्याने या भागातील सर्वच वीटभट्टीधारकांच्या अडचणी वाढल्या होत्या.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण