शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सर्वांची - रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:10 IST

महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देमराठा मंडळ सभागृहात आयोजित जननी-२ उपक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यावेळी बोलत होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जननी-२ उपक्रम हा महिलांसाठी त्यांचे हक्क व अधिकार जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी महिला सबलीकरण कार्यक्रमाचे वृत्तांत वाचन केले.

अकोला - अकोला पोलिसांनी समाजातील महिलांच्या सुरक्षा व सबलीकरणासाठी राबविलेला जननी-२ हा उपक्रम कौतुकास्पद असून, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.मराठा मंडळ सभागृहात आयोजित जननी-२ उपक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जननी-२ उपक्रम प्रभावीरीत्या राबविल्याने अकोला पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. यासोबतच सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जननी-२ उपक्रम हा महिलांसाठी त्यांचे हक्क व अधिकार जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले, तर प्राचार्य बी. जी. शेखर यांनीही या उपक्रमाचा महिलांना चांगला फायदा होणार असून, त्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असल्याचे सांगितले. तर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी अकोला पोलीस प्रशासनातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने हा उपक्रम घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगत या पोलिसांचे आभार मानले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी महिला सबलीकरण कार्यक्रमाचे वृत्तांत वाचन केले व शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात किरण सुरज जरांगे, पृथ्वी विशाल काकड, इशानी किरण साठे, साक्षी उमेश गायधने, स्वप्ना चेतन चौधरी आदींनी कबड्डी, सांस्कृतिक, कथ्थक, बॉक्सिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उप विभागीय पोलीस अधीकारी सुनील सोनोने, कल्पना भराडे, सोहेल शेख, पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पत्नी तन्वी सागर, नीता पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय