शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारातून ६०३६ तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:58 IST

६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

अकोला: गेल्या २४ महिन्यात घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी-समस्यांचे निवारण करण्यासाठी गत २४ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात १५ दिवसातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनता दरबार घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध ३६ विभागांसंबंधी ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या. जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, त्यासंदर्भात अनुपालन अहवाल प्राप्त झाले आहेत. जनता दरबारात नागरिकांकडून सर्वात जास्त तक्रारी प्राप्त होणाऱ्या चार विभागांमध्ये महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस विभागाचा समावेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सावकारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच शेतरस्त्यांची कामे व अतिक्रमणे हटविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, सामूहिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांना मान्यता!अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांच्या आकृतीबंधाला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील