शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

लघुसिंचनचे ठराव अडकले चर्चेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 13:06 IST

अकोला: जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी देण्याच्या मुद्यांचे पाच ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आले.

अकोला: जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी देण्याच्या मुद्यांचे पाच ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आले. त्यामध्ये भूसंपादनाचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासोबतच सुधारित मान्यता देण्याच्या ठरावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित करण्यासाठी नावासह ठराव मांडण्यात आल्याने या मुद्यावर सभागृहात राजकारण झाले.लघुसिंचन विभागाकडून कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव, पाझर तलावांसाठी जमीन संपादन केलेल्या विविध प्रकरणात शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी ९४ लाख रुपये निधी जिल्हा परिषदेने द्यावा, या मागणीचा ठराव मांडण्यात आला. त्यावर भूसंपादन प्रकरणात मोबदला देण्यासाठी शासनाची जबाबदारी आहे. शासनाकडे सातत्याने मागणी करूनही गेल्या चार वर्षांत हा निधी मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयाकडून जप्तीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी आता जिल्हा परिषदेनेच हा निधी द्यावा, अशी मागणी लघुसिंचन विभागाने केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख या प्रकरणात दोषी कोण आहे, चार वर्षांपासून निधी का दिला नाही, जिल्हा परिषदेने सर्वच भूसंपादन प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा, विलंब करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर सदस्य गोपाल कोल्हे, दामोदर जगताप यांनी पुढे येत शासनाने गेल्या चार वर्षांपासून निधी का दिला नाही, याची विचारणा व्हावी तसेच पाठपुरावा करून शेतकºयांना न्याय द्यावा, असे सुचवले.सोबतच बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव सिंचन तलाव दुरुस्तीच्या कामाला प्रचंड निधीची मागणी करण्यात आली. खडका येथील कोल्हापुरी बंधारा दुरुस्तीसाठी २०१३-१४ च्या किमतीनुसार अंदाजपत्रक मंजूर आहे. त्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेत अधिक निधी मागितला जाईल, यासाठी थांबविण्यात आले. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बाजार येथील कोल्हापुरी बंधाºयाचे मूळ अंदाजपत्रक १ कोटी ३० लाख रुपयांवरून २ कोटी ११ लाख रुपयांवर गेले. त्याला कशी मंजुरी द्यायची, या विषयावरही नितीन देशमुख यांनी अधिकाºयांना जाब विचारला. अकोट तालुक्यातील धामणा साठवण तलावाला सुधारित प्रशासकीय मान्यतेचा ठरावही मागे ठेवण्यात आला.- रस्ते दर्जोन्नत करण्यात राजकारणजिल्ह्यातील काही रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून नाव द्यावे, यासाठी सर्वसाधारण सभेत आलेल्या ठरावावर काही व्यक्तींची नावे टाकण्यात आली. हा प्रकार राजकारणासाठी केला जात आहे, असे स्पष्ट झाल्याने तो मागे ठेवण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद