शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आज आरक्षण सोडत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:49 IST

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत सोमवार, १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये प्रवर्गनिहाय पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, कोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पं.स. सभापतींची निवड १६ जानेवारीला !जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवड १६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. सातही पंचायत समित्यांच्या विशेष सभा बोलाविण्यात येणार असून, त्यामध्ये सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांना विशेष सभेच्या नोटीस पाठविण्यात येणार आहेत.जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारीला!जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे. विशेष सभेच्या नोटीस जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना सोमवारी पाठविण्यात येणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाpanchayat samitiपंचायत समिती