शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परीटांच्या आरक्षणाला सामाजिक न्याय मंत्रालयाचा खोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:52 IST

अकोला: राज्यातील धोबी(परीट) समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने केंद्राला पाठविण्याचे आदेश मुख्यमत्र्यांनी दिल्यानंतरही सामाजिक न्यायमंत्री उदासीन असल्याचे दिसून येते.

अकोला: राज्यातील धोबी(परीट) समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने केंद्राला पाठविण्याचे आदेश मुख्यमत्र्यांनी दिल्यानंतरही सामाजिक न्यायमंत्री उदासीन असल्याचे दिसून येते. दस्तूरखुद्‌द धोबी समाजाच्या आरक्षणाला सामाजिक न्याय मंत्रालयाच खोडा टाकत असल्याचा आरोप महाराष्ट्र धोबी समाज आरक्षण समितीचे महासचिव अनिल शिंदे यांनी केला आहे. 

धोबी समाजाला अनूसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, म्हणून गेल्या 70 वर्षांपासून धोबी समाज शासनासोबत भांडत आहे. वेळोवेळी आंदोलन झाल्यानंतर 2002 मध्ये डॉ. भांडे समिती नेमण्यात आली. त्यांनी या समाजाला अनूसचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी शिफारस करून तो अहवाल केंद्राला पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार ते प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला. मात्र, यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेचा अहवाल जोडण्यात आला होता. यामध्ये धोबी समाजाला बहिष्कृत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांचा समावेश सूचीमध्ये करण्यात आला नाही. याविरोधात धोबी समाजातील संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले. 2018 मध्ये मोठ्‌याप्रमाणात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर जिल्हृयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धोबी समाजाचे नेते डी.डी. सोनटक्‍के व पदाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. तसेच सामाजिक न्याय विभागाला असे आदेशही दिले होते. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर सहृयाही झाल्या आहेत. मात्र, या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले हे हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र धोबी (परिट) समाज आरक्षण समितीचे प्रदेश महासचिव अनिल शिंदे यांनी केला आहे. आरक्षण हा धोबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्‍न असून सरकारच जर वेळकाढूपणा करीत असेल तर याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  मुख्यमंत्र्यांनी आपले काम चोख केले आहे. परंतु, त्या विभागाचे मंत्री आता खोडा घालीत आहे. यामुळे समाज संतप्त झाला आहे. याविरोधात पुन्हा आंदोलन करणार आहे. तसेच येत्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल, - अनिल शिंदे,प्रदेश महासचिव महाराष्ट्र धोबी (परिट) समाज आरक्षण समिती

टॅग्स :Akolaअकोलाreservationआरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस