शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आरक्षण आमचा हक्क; सरकारने निर्णय घ्यावा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:47 IST

‘आरक्षण आमचा हक्क असून, त्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा ’ अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी सोमवारी येथे केली.

ठळक मुद्देविकास महात्मे यांची मागणी रविवारी नागपुरात धनगर आरक्षण निर्णायक मेळावा

अकोला : धनगर आरक्षण निर्णायक मेळावा रविवार, ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे, असे सांगत ‘आरक्षण आमचा हक्क असून, त्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा ’ अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी सोमवारी येथे केली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथील स्नेह नगर ग्राऊंड येथे धनगर आरक्षण निर्णायक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याच्या पृष्ठभूमीवर धनगर आरक्षण आणि सरकारची भूमिका यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला सर्वच पक्षातील आणि अपक्ष धनगर समाजाचे आमदार उपस्थित राहणार असल्याचे डॉ.महात्मे यांनी सांगीतले.आरक्षण आमचा हक्क असून, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने शिफारस करुन, तातडीने निर्णय घेतला पाहीजे, असे सांगत झारखंड, ओरिसा व बिहार या राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही आरक्षण मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. आम्ही आदिवासी आरक्षणाच्या विरोधात नसून, आदिवासी समाजाही धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही; मात्र काही आदिवासी नेत्यांचा विरोध असल्याचेही डॉ.महात्मे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ.किशोर मुखमाले, नगरसेविका सुमन गावंडे, अनंत कोरडे, अनंत कोरडे, उमेश अवघड,जगतपाल कोगदे यांच्यासह धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका !आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता,धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची सकरात्मक भूमिका आहे, असेही डॉ.महात्मे यांनी यावेळी सांगीतले.

 

टॅग्स :agitationआंदोलनPoliticsराजकारण