शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ठरले आरक्षण!

By संतोष येलकर | Updated: October 21, 2023 19:17 IST

चालू वर्षभराच्या कालावधीसाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा योजनांकरिता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले आहे.

अकोला: चालू वर्षभराच्या कालावधीसाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा योजनांकरिता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांसह अन्य योजनांसाठी जिल्ह्यातील सात प्रकल्पांतून ९२.६७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यास जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत १६ ऑक्टोबर रोजी मंजुरी देण्यात आली.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी आरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या वर्षभराच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सात प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार अकोला शहर पाणीपुरवठा योजनांसह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा आणि अन्य तीन योजनांसाठी ९२.६७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. काटेपूर्णा धरणातून अकोला शहराला मिळणार २४ दशलक्ष घनमीटर पाणी निश्चित करण्यात आलेल्या पाणी आरक्षणानुसार येत्या वर्षभराच्या कालावधीत महान येथील काटेपूर्णा धरणातून येत्या वर्षभराच्या कालावधीत अकोला शहर पाणीपुरवठा योजनेला २४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे. या पाणीसाठ्यावर अकोला शहरवासीयांची तहान भागविण्यात येणार आहे. प्रकल्पनिहाय असे आहे पिण्याच्या पाण्याचे आरक्षणकाटेपूर्णा प्रकल्प : या प्रकल्पातून अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी २४ दलघमी, महान मत्स्यबीज केंद्र पाणीपुरवठा योजनेसाठी ०.८५ दलघमी, ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६.९९ दलघमी, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ३.५३ दलघमी, अकोल्यातील ‘एमआयडीसी’साठी ०.७४ दलघमी.

वान प्रकल्प : या प्रकल्पातून अकोट शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ८.६६ दलघमी, तेल्हारा शहर पाणीपुरवठा योजनेसाठी २ दलघमी, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १०.७५ दलघमी.मोर्णा प्रकल्प : या प्रकल्पातून पातूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १.२४२ दलघमी, देऊळगाव पास्टुल १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १.९१ दलघमी.

निर्गुणा प्रकल्प : या प्रकल्पातून आलेगाव-नवेगाव १४ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १.७९ दलघमी. 

उमा प्रकल्प : या प्रकल्पातून लंघापूर ५९ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १.३० दलघमी.मन नदी : या प्रकल्पातून पारस औष्णिक केंद्रासाठी १४.५० दलघमी. शेगावसाठी मन नदी, कसुरा बंधाऱ्यातून पाणी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानसाठी अकोला जिल्ह्यातील मन नदी प्रकल्पातून १.०४ दलघमी आणि कसुरा बंधारा प्रकल्पातून ०.७५ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण