शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 10:29 IST

Sarpanch Reservation सरपंचपदांचे आरक्षण सोमवार, १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सोमवार, १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती व अनसूचित जमाती प्रवर्गाच्या सरपंचपदांचे यापूर्वी जाहीर केलेले आरक्षण कायम ठेवून, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) व सर्वसाधारण प्रवर्गाच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती १२५, अनुसूचित जमाती ४५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) १४४ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१८ सरपंचपदे आरक्षित करण्यात आली.

जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील मुदत संपलेल्या २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले होते; परंतु जाहीर करण्यात आलेले सरपंचपदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या कालावधीत सरपंचपदांची आरक्षण सोडत नव्याने काढण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिला होता. त्यानुसार २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सरपंचपदांचे यापूर्वी जाहीर केलेले आरक्षण कायम ठेवून, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) व सर्वसाधारण प्रवर्गाच्या सरपंच पदांसाठी आरक्षणाची सोडत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात आली व प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती १२५, अनुसूचित जमाती ४५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १४४ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१८ सरपंचपदे आरक्षित करण्यात आली.

 

महिला सरपंचपदांचे आरक्षण ३ फेब्रुवारीला!

जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये जाहीर झाल्यानंतर, जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.

 

 

तालुकानिहाय ग्रामपंचायती व सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण !

तालुका             ग्रा. पं.            अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र सर्वसाधारण

तेल्हारा             ६२             १४             ०६             १७             २५

अकोट             ८४             १६             १२             २३             ३३

मूर्तिजापूर             ८६             २२             ०३             २३             ३८

अकोला             ९७             २८             ०८             २६             ३५

बाळापूर             ६६             २१             ०२             १८             २५

बार्शीटाकळी ८०             १२             ०६             २२             ४०

पातूर             ५७             १२             ०८             १५             २२

....................................................................................................................................................

एकूण             ५३२             १२५             ४५             १४४             २१

टॅग्स :Akolaअकोलाsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत