शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘जीएमसी’त नवजात शिशूंच्या वाढीवर संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 14:52 IST

माहितीच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला सुरुवात करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यात संशोधनाचा अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मेडिकल रिसर्च कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अंतर्गत अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशूंच्या वाढीवर संशोधन करण्यात येत आहे. या अंतर्गत गत दोन वर्षात २ हजार शिशूंचे निरीक्षण करण्यात आले असून, यामध्ये नवजात शिशूंच्या वजनासह डोक्याचा घेर आणि उंचीदेखील मोजली जात आहे. या आधारावर शिशूंमधील कुपोषणावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होणार असल्याचा दावा संशोधक ांकडून केला जात आहे.जागतिक आरोग्य संघटनेअंतर्गत २०१४ ते २०१७ या कालावधीत जगातील आठ देशांमध्ये गर्भामध्ये शिशूंच्या वाढीवर अभ्यास केला आहे. यामध्ये भारताचा समावेश असून, नागपूरमध्ये या संशोधनाचे केंद्र होते. याच संशोधनाचा आधार घेऊन ‘इंटर ग्रोथ-२१’च्या आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार, अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांच्या वाढीवर संशोधन करण्यात येत आहे. साधारणत: ६ महिने ते ५ वर्षांआतील बालकांमध्ये सॅम आणि मॅम असे कुपोषणाचे निकष लावले जातात; मात्र हेच निदान गर्भातच किंवा जन्मत:च झाल्यास कुपोषणावर मात करण्यास मोठी मदत होईल.संशोधनासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयातील नवजात बालकांचे निरीक्षण करण्यात आले. यासाठी डॉक्टरांना मेडिकल रिसर्च कौन्सिल आॅफ महाराष्ट्रमार्फत अनुदान मिळाले असून, गत दोन वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. हे संशोधन बालरोग तज्ज्ञ डॉ. ऊर्मिला देशमुख, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विनित वरठे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल आणि डॉ. अपर्णा वाहाणे यांच्या निरीक्षणात होत आहे.

विश्लेषणात्मक अभ्यास सुरूसंशोधनांतर्गत निरीक्षणातून २ हजार बालकांची माहिती मिळविण्यात आली आहे. उपलब्ध माहितीच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला सुरुवात करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यात संशोधनाचा अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.नवजात बालकांच्या वाढीवर दोन वर्षांपासून अकोला जीएमसीत संशोधन सुरू आहे. संशोधनांचा अंतिम निष्कर्ष येणे बाकी आहे; परंतु या आधारावर कुपोषणापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होईल.- डॉ. ऊर्मिला देशमुख, संशोधनक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय