शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन 

By atul.jaiswal | Updated: July 19, 2023 14:29 IST

पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात आणले. 

अकोला : संततधार पावसामुळे मुर्तीजापूर तालुक्यातील नदी-नाल्यांना पुर आला असून, चिखली व खरब ढोरे या गावांना पुराचा वेढा बसला आहे. खरब ढोरे येथील एक शेतकरी गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतात पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात आणले. 

खरब ढोरे आणी चिखली  ही दोन गावे रात्री तीन वाजता पासुन पुराने वेढल्या गेली. यात अडकलेल्या ग्रामस्थ व जनावरांचे रेस्क्यु करण्यासाठी  मुर्तीजापूर उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार बोबडे व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले. क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, अंकुश सदाफळे, ज्ञानेश्वर म्हसाये, शरद महल्ले, मयुर कळसकार, महेश वानखडे, शिवम वानखडे,दिपक गांजरे,ऋतीक सदाफळे,यांचेसह शोध व बचाव साहित्यासह रेस्क्यू बोट घेऊन चिखली येथे घटनास्थळी दाखल झाले. 

तेथील परीस्थिती नियंत्रणात आणुन लगेचच खरब ढोरे येथे रेस्क्यु टीम दाखल झाली.  अर्ध्या गावाला पुराने वेढले होते. अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. यावेळी गावातील बाजीराव उईके (४५) हा शेतकरी रात्रीपासून पुराने वेढलेल्या शेतात अडकून पडल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करत शेताच्या दिशेन रबरी बोट मार्गस्थ केली. पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडचणी येत होत्या. सर्व अडचणी पार करत रेस्क्यू पथक शेतात पोहोचल व तेथे झाडाच्या आश्रयाने असलेल्या बाजीराव उईके यांना बोटीत बसवून परत गावात आणले. 

टॅग्स :Akolaअकोला