शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे ‘आरटीपीसीआर’चे रिपोर्टिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 09:48 IST

Cloud Pathology Lab : गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ‘क्लाउड पॅथोलॉजी लॅब’ची मदत घेतली जात आहे.

ठळक मुद्दे एका क्लिकवर मिळणार कोविड चाचणी अहवाल संसर्गाचा फैलाव टाळण्यास होईल मदत
अकोला: ‘आरटीपीसीआर’ चाचणी केल्यानंतर नागरिकांना आता क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे चाचणी अहवालाचे रिपोर्टिंग केले जात आहे. या माध्यमातून चाचणी करणाऱ्या व्यक्तीला थेट मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येत असून एका क्लिकवर नागरिकांना आपला चाचणी अहवाल पाहता येत आहे. त्यामुळे कोविडचा फैलाव टाळण्यास मोठी मदत होणार आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण वाढले होते. त्याचा ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅबवर आला होता. आलेले अहवाल लॅबद्वारे स्वॅब संकलन केंद्रांना पाठविले जात होते; मात्र त्यानंतरची अहवालासाठी सर्वोपचार रुग्णालयातच गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ‘क्लाउड पॅथोलॉजी लॅब’ची मदत घेतली जात आहे. या प्रणाली अंतर्गत आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्टिंग केली जात आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब देणाऱ्या प्रत्येकाला आता एका क्लिकवर त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे अहवालासाठी नागरिकांची होणारी दगदग, तसेच सर्वोपचार रुग्णालयात होणारी गर्दी टाळणे शक्य झाले आहे.क्युआर कोड अनिवार्यक्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर चाचणी अहवालामध्ये क्युआर कोड अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचा उपयोग परदेशी जाण्यासाठी विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे.ही काळजी आवश्यकक्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर अहवालामध्ये चुकी झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करणे शक्य नाही.त्यामुळे स्वॅब संकलन केंद्रावर माहिती देताना ती अचूक देणे गरजेचे आहे.आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि रहिवासी पत्ता ही माहिती योग्य नोंदविली की नाही, याची खातरजमा करणेही गरजेचे आहे.नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास सोईचे जावे, या अनुषंगाने क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे नागरिकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला जातो. त्यामुळे नागरिकांना चाचणी अहवालासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. घरी बसूनच अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह याची माहिती मिळणे शक्य झाले आहे.- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, व्हीआरडीएल, जीएमसी, अकोला
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या