शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त, अधीक्षक अभियंत्यांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:01 IST

अकोला : शहरातील सहा काँक्रिट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) अहवालात सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत ...

अकोला : शहरातील सहा काँक्रिट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) अहवालात सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आढळून आला. त्यानुषंगाने यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी ‘सोशल आॅडिट’चा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १२ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. यासोबतच शासनाच्या संबंधित विभागाकडेही माहितीसाठी अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे यासंदर्भात आता काय कारवाई केली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शासनामार्फत उपलब्ध निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेप्रमाणे पूर्ण होणे आवश्यक असताना शहरात करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्यांवर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे निर्दशनास आल्याने, शहरातील रस्ते कामांचे सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढला. त्यानुसार सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणात गत २२ ते २७ जुलै दरम्यान शहरातील अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, माळीपुरा ते मोहता मिल, नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय आणि अशोक वाटिका ते सरकारी बगिचा इत्यादी सहा काँक्रिट रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले होते. रस्ते कामांच्या नमुने तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत २४ आॅक्टोबर रोजी जाहीर केला. त्यानुसार शहरातील सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासन निधीतून शहरातील रस्ते कामांतील खाबूगिरी चव्हाट्यावर आली. संबंधित यंत्रणा म्हणून यासंदर्भात महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढील कारवाई करावयाची आहे. त्यानुषंगाने रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’चा अहवाल १२ नोव्हेंबर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला. यासोबतच शासनाच्या संबंधित खात्याकडेही माहितीसाठी अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यामुळे दर्जाहीन रस्ते कामांच्या या मुद्यावर संबंधित यंत्रणांकडून आता काय कारवाई केली केली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शासनासह लोकप्रतिनिधींकडेही माहितीसाठी पाठविला अहवाल!शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’चा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदारांकडेही माहितीसाठी अहवाल पाठविण्यात आला आहे.

 

शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणाचा (सोशल आॅडिट) अहवाल संबंधित यंत्रणा म्हणून महानगरपालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे, तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडेदेखील माहितीसाठी अहवाल पाठविण्यात आला आहे.-आस्तिककुमार पाण्डेय,जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय