शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानीचा अहवाल अखेर शासनाकडे

By admin | Updated: November 8, 2014 00:14 IST

अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

अकोला : गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनंतर अखेर शुक्रवारी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यानंतर झालेला पाऊसही अल्प प्रमाणात झाला; मात्र गेल्या २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना तडाखा बसला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने, पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांमार्फत करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात आले, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर, पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल १ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तयार करण्यात आलेल्या पीक नुकसानीच्या या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये २३७ गावांमध्ये ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असून, १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्याच्या आत नुकसान झाले. अतवृष्टीनंतर तब्बल तीन महिन्याने, जिल्ह्यातल्या चार तालुक्यातील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अखेर शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी विभागीय शासनाकडे पाठविण्यात आला. *७६३ हेक्टर जमीन खरवडून गेली!अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ७६३ हेक्टर ५९ आर शेतजमीन खरवडून गेली. त्यामध्ये आकोट तालुक्यात १९२.0८ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ३१५.९४ हेक्टर, बाळापूर तालुक्यात २८.0१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात २२५.१५ हेक्टर शेतीचे क्षेत्र खरवडून गेल्याचेही पीक नुकसानीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

*नुकसानभरपाईची शेतकर्‍यांना प्रतीक्षा!यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यातच अतवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.