शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तुटू पाहणा-या ८१ संसारवेली समुपदेशनाने पुन्हा जुळल्या

By admin | Updated: October 15, 2015 00:15 IST

पाच प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल.

अनिल गवई / खामगाव : छोट्या-मोठय़ा कारणांवरून दाम्पत्यामधील होणारे व विकोपाला जाणारे वाद येथील महिला समुपदेशन केंद्राने वेळीच थांबवून तब्बल ८१ जणांचे संसार पुन्हा फुलविले आहेत. दीड वर्षात या केंद्रांतर्गत १८८ आनुषंगिक प्रकरणे आली. त्यात उभय बाजूंना परस्पर समन्वय व विश्‍वासाची जाणीव करून देत हे संसारवेल पुन्हा फुलविण्यात आले आहे. अन्य पाच प्रकरणांत पोलिसांत गुन्हेही दाखल करावे लागलेले आहेत. कौटुंबीक कलहातून झालेल्या तब्बल ८१ जोडप्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर लावण्यात शहर पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्राला यश आले होते. एका घरात राहायचे, तर ह्यभांड्याला भांडे लागणारह्णच. या उक्तीचा परिचय देत आता हे जोडपे पुन्हा आपल्या संसारात रमले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला तक्रार निवारण कक्षात बुलडाणा येथील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळाला ह्यसमुपदेशन केंद्रह्ण चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिला दिन आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १0 मार्च २0१४ रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात जीवनधारा संस्थेने एमएसडब्ल्यू झालेल्या स्वाती इंगळे, स्नेहल ठाकूर या दोन कर्मचार्‍यांना समुपदेशनासाठी नियुक्त केले आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षांंंंच्या कालावधीत घरगुती कलहाचे १८८ प्रकरणं समुपदेशन केंद्राकडे दाखल झाले. त्यापैकी ८१ दहा जोडप्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी समुपदेशन केंद्राला यश आले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील काही कौटुंबीक प्रकरणांचा समावेश आहे. तर केवळ पाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३६ प्रकरणांमध्ये कोर्टात जाण्यासाठी समज देण्यात आला असून, ३९ प्रकरणांची फाईल बंद करण्यात आली आहे. तर दोन प्रकरणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वळती करण्यात आली आहेत.