शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५.५१ कोटींतून ६२ शाळांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:52 IST

जिल्ह्यातील ६२ शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यातील ६२ शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ५ कोटी ५१ लाख रुपये खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे, आधीची यादी सदोष असल्याने ती रद्द करून नव्या यादीला मंजुरी देण्यात आली. त्या प्रकाराला जबाबदार असलेल्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे.चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील २५७ शाळा नादुरुस्त आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार शिकस्त शाळा पाडण्यासाठी १०९, त्यानंतर १० शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यांना मंजुरी मिळाली, तर १३४ शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव होते. त्यापैकी ६२ शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झाले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील अन्वी, मजलापूर उर्दू-मराठी, वल्लभनगर, कोळंबी, सुकळी नंदापूर, धामणा, बहिरखेड, पातूर नंदापूर उर्दू, बाखराबाद. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर, मुंडगाव मुले, दिनोडा, पुंडा, देवरी, मार्डी, बोर्डी खुर्द, खापरवाडी, पनोरी. बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रूक, मोरझाडी, खंडाळा, पारस मराठी मुले, टाकळी खोजबोळ, बोरगाव वैराळे, धनेगाव, शिंगोली, जोगलखेड, स्वरूपखेड. बार्शीटाकळी तालुक्यातील महान उर्दू, राजंदा, बार्शीटाकळी मुले उर्दू, मराठी मुले, विझोरा, वरखेड खुर्द, निभारा, निंबी कोसगाव, कोथडी खुर्द, जलालाबाद, मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव, सिरसो, पारद, सांगवा मेळ, मुंगशी, धामोरी बुद्रूक, विराहित. पातूर तालुक्यातील गावंडगाव, बाभूळगाव, तुलंगा खुर्द, मळसूर, माळराजुरा, चोंढी, कोठारी बुद्रूक, कोसगाव, भानोस मलकापूर. तेल्हारा तालुक्यातील अडगाव-३, दानापूर, हिवरखेड व मनात्री या शाळांचा समावेश आहे.- चुकीच्या प्रस्तावप्रकरणी कारवाईदरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे सादर केलेली यादी चुकीची आहे. त्यामुळे निधी नियोजनाच्या मुद्यावरच अनियमितता होऊ शकते, यासाठी ती यादी रद्द करण्यात आली. चुकीची यादी सादर करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पत्रात जिल्हाधिकाºयांना सांगितले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील संबंधितांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा