शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील २४७ पोलीस निवासस्थानं होणार चकाचक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:56 IST

 अकोला - अकोला शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसह तालुका व ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

- सचिन राऊत

 अकोला - अकोला शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसह तालुका व ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तब्बल २४७ पोलीस निवासस्थान लवकरच चकाचक होणार आहेत.राज्य शासनाने निवासस्थान दुरुस्तीसाठी ९ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अकोला शहरातील १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर शहरातीलच १३७ पोलीस कर्मचारी सेवा निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर पातूर येथील शिपाई दल सेवा निवासस्थानाची दुरुस्ती, मूर्तिजापूर येथील दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांसाठीचे निवासस्थान दुरुस्ती, दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस हवालदार, सहा पोलीस शिपाई आणि आणखी आठ पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची या निधीतून दुरुस्ती होणार आहे. बार्शीटाकळी येथील सहा अविवाहित पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. यासोबतच पिंजर येथील १२ पोलीस कर्मचारी, तेल्हारा येथील आठ पोलीस कर्मचारी, हिवरखेड येथील १३ पोलीस कर्मचारी आणि अकोट येथील २८ पोलीस कर्मचाºयांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमध्ये ही निवासस्थानं चकाचक करण्यात येणार असून, निधी प्राप्त होताच या निवासस्थान दुरुस्तीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. या निवासस्थान दुरुस्तीसाठी १० कोटी ४१ लाख २६ हजार ८४४ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पैकी नऊ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

३९२ निवासस्थानांचे बांधकाम जोरातपोलिसांसाठी निमवाडी बसस्थानकासमोर तब्बल ३९२ निवासस्थानांचे बांधकाम जोरात सुरू आहे. त्यामुळे ४०० पोलीस कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा होणार आहे. यासोबतच आता दुरवस्था झालेल्या तब्बल २४७ निवासस्थानांचीही चांगली दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ७०० वर अधिकारी, कर्मचाºयांना शासकीय निवासस्थानाची सुविधा होणार आहे.

जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना घरासाठी फिरावे लागत होते; त्यामुळे त्यांना हक्काचे आणि शासनाचे घर मिळावे, यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शासनाने २४७ निवासस्थानांची दुरुस्तीसाठी मंजुरी दिल्याने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा मिळणार आहेत.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस