शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टर्स-बॅनर्स काढा; पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:19 IST

राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पोस्टर्स, बॅनर्स ७२ तासांत काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत.

अकोला : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सरकारी कार्यालयांच्या इमारतींवर, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी इमारतींवर विनापरवानगी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात सरकारी कार्यालयांच्या इमारतींवरील राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट व झेंडे २४ तासांत काढावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे फलक ४८ तासांत काढण्यात यावे आणि खासगी मालमत्तेच्या इमारतींवर विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पोस्टर्स, बॅनर्स ७२ तासांत काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिका, नगरपालिकांसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची शासकीय वाहने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १ हजार ७०३ मतदान केंद्र असून, निवडणूक दरम्यान नागरिकांना कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्यास ‘सिव्हिजिल’ या अ‍ॅपद्वारे तक्रारी करता येणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर भरारी पथके, व्हिडिओ पाहणी पथके, स्थिर पथके, खर्च निरीक्षण पथके गठित करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड व निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड उपस्थित होते.... तर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल होणार!विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने, सरकारी कार्यालय इमारतीवरील, सार्वजनिक ठिकाणी व खासगी इमारतींवर लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट व झेंडे विहित मुदतीत राजकीय पक्षांनी काढले नाही तर संबंधित यंत्रणांच्या पथकांमार्फत पोस्टर्स, बॅनर्स व झेंडे काढण्यात येतील आणि विहित मुदतीत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे न काढणाºयांविरुद्ध आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019