शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अतिक्रमकांना पिटाळले ; शहराच्या मध्यवर्ती भागाने घेतला माेकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:25 IST

Akola Municipal Corporation पर्यायी जागा दिल्यानंतरही रस्त्यालगत बाजार मांडणाऱ्या अतिक्रमणांविराेधात साेमवारी कारवाइचे हत्यार उपसले.

अकाेला: महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून अवघ्या सात दिवसांचा कालावधी पूर्ण हाेत नाही ताेच निमा अराेरा ‘ॲक्शन माेड’वर आल्याचे पहावयास मिळाले. गांधी राेड, खुले नाट्यगृह ते शास्त्री स्टेडियम,जैन मंदिर परिसरातील लघु व्यावसायिक,फेरीवाल्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा दिल्यानंतरही रस्त्यालगत बाजार मांडणाऱ्या अतिक्रमणांविराेधात साेमवारी कारवाइचे हत्यार उपसले. यावेळी अतिक्रमकांना अक्षरश: पिटाळून लावण्यात आले. या कारवाईमुळे शहराच्या मध्यवर्ती भागाने माेकळा श्वास घेतल्याचे चित्र समाेर आले.

शहरातील मुख्य बाजारपेठ,शासकीय आवारभिंती, माेठे नाले तसेच प्रमुख चाैकांमध्ये अतिक्रमकांनी बजबजपुरी निर्माण केल्याची परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीच्या काेंडीसह अनेक समस्या निर्माण झाल्या असून अतिक्रमकांच्या मुजाेरीसमाेर प्रशासनाने गुडघे टेकल्याचे चित्र आहे. मतांच्या समीकरणापायी मनपातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक अतिक्रमकांची पाठराखण करतात. त्यामुळे मनपा आयुक्त निमा अराेरा ही समस्या निकाली काढतील की नाही,याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. यादरम्यान, गांधी राेड, खुले नाट्यगृह ते शास्त्री स्टेडियम ते दीपक चाैक, मानेक टाॅकीज ते टिळक राेड, सिटी काेतवाली ते गांधी चाैक, जैन मंदिर परिसर व गांधी चाैकातील चाैपाटीवरील अतिक्रमकांना आयुक्त अराेरा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने पिटाळून लावले.

 

...अन् आयुक्त उतरल्या रस्त्यावर

सकाळी ११.४७ ला अतिक्रमण हटाव माेहिमेला सुरुवात झाली. यावेळी आयुक्त निमा अराेरा चक्क अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनात बसून कारवाईसाठी निघताच कर्मचारी व सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. खुले नाट्यगृहाजवळ येताच एका महिला व्यावसायिकासह काही प्लास्टिक विक्रेत्यांनी कारवाईला प्रखर विराेध दर्शवताच आयुक्त अराेरा वाहनाच्या खाली उतरल्या. आयुक्तांच्या निर्देशानंतर मुजाेरी करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू हाेती.

 

रस्त्यावर साहित्य ठेवणे भाेवले

मनपाकडून कारवाई हाेत असल्याचे दिसत असतानाही टिळक राेडवर सायकल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी रस्त्यालगत सायकली उभ्या केल्या हाेत्या. नव्या काेऱ्या सायकली जप्त करण्यासाेबतच लघु व्यावसायिकांचे प्लास्टिकचे साहित्य, हातगाड्या आदी जप्तीची कारवाई करण्यात आली.

अतिक्रमणाच्या समस्येने शहरात पायी चालणेही मुश्कील झाले आहे. वाहतुकीला अडथळा हाेईल,अशा पध्दतीने व्यवसाय करणे अपेक्षित नाही आणि यापुढे खपवूनही घेतला जाणार नाही.

-निमा अराेरा आयुक्त,मनपा

 

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला