शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियातून ग्रामपंचायती दूरच;  ग्रामस्थांना इंटरनेट अ‍ॅक्सेसची सुविधा कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:51 IST

अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायती जिल्हा आणि राज्य स्तराशी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची सुविधा सुरूच झाली नाही. डिजिटल इंडियाचा सर्वाधिक पर्दाफाश नोटबंदीच्या काळातच झाला. डिजिटल ग्रामपंचायती कधी अस्तित्वात येणार, याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.

अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत. त्यामुळे याबाबत सद्यस्थिती काय आहे, याची माहितीही शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. दिशा समितीच्या बैठकीत ही माहिती ठेवणे आवश्यक असताना तेथेही ती दिली जात नसल्याची माहिती आहे.डिजिटल इंडियाच्या नावे केंद्र शासनाने आतापर्यंत प्रचंड बोंब मारली आहे. त्यासाठी नोटबंदीच्या काळात आॅनलाइन व्यवहार करण्याचा पर्यायही नागरिकांसमोर ठेवण्यात आला. डिजिटल इंडियाचा सर्वाधिक पर्दाफाश नोटबंदीच्या काळातच झाला. ग्रामीण भागात गतीने वापरली जाईल, अशी इंटरनेटची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे पॉस मशीनद्वारे व्यवहार कसे करावे, ही समस्या विचारतानाच ती विरून गेली. त्याशिवाय, ग्रामपंचायतींमध्येच सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम शासनाने सुरू केला; मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी ती कागदपत्रे मिळणेही कठीण झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील अनेक कामे आताही तालुका किंवा मोठ्या वस्तीच्या ठिकाणी जाऊनच करावी लागतात. ही समस्या ग्रामीण भागात सर्वत्र असताना केंद्र शासनाने डिजिटल इंडियाचा नारा ठोकला. त्याचवेळी ग्रामपंचायतींमध्ये ती सोय करता येते की नाही, याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच डिजिटल इंडियाची घोषणा सध्यातरी हवेतच आहे. सर्व ग्रामपंचायती जिल्हा आणि राज्य स्तराशी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची सुविधा सुरूच झाली नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या घोषणेनंतर किती ग्रामपंचायती डिजिटल झाल्या, याची कोणतीही माहिती प्रशासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. परिणामी, डिजिटल इंडियात डिजिटल ग्रामपंचायती कधी अस्तित्वात येणार, याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.- ग्रामपंचायतमध्ये उभारणार केंद्र!डिजिटल इंडियात ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी जागा आवश्यक आहे. त्या ठिकाणी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्यानुसार इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. त्या ठिकाणी ग्रामस्थांना इंटरनेट अ‍ॅक्सेसची सुविधा दिली जाईल, असे शासनाने आधीच्या घोषणेत सांगितले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत