शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:44 IST

आयुक्तांच्या निर्णयामुळे कंपनीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

अकोला: शहराच्या विविध भागात खोदकाम करून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने टाकलेल्या केबलची तपासणी करण्याचा आदेश मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिला. आयुक्तांच्या निर्णयामुळे कंपनीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.शासनाच्या महानेट प्रकल्पांतर्गत शहरात २६ किमी अंतराचे केबल टाकण्याचा कंत्राट स्टरलाइट टेक कंपनीला देण्यात आला आहे. शासनाचा प्रकल्प असल्यामुळे रिस्टोरेशन चार्ज आकारण्याची आवश्यकता नसल्याचा शोध कंपनीसह महापालिका प्रशासनाने लावल्यामुळे मनपाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यादरम्यान, स्टरलाइट कंपनीच्या सोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडूनही शहरात मनपाच्या परवानगीशिवाय फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची बाब समोर आली. यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने दोन्ही कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांनी टाकलेले केबल शोधण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले होते. यामध्ये मनपाने स्टरलाइट कंपनीचे केबल तपासण्याचे काम पूर्ण केले. यादरम्यान रिलायन्स कंपनीने मनपाच्या तपासणीपासून चार हात लांब राहणे पसंत केले. ही बाब समोर येताच मंगळवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स कंपनीने आतापर्यंत शहरात टाकलेल्या संपूर्ण केबलची तपासणी करण्याचा आदेश बांधकाम विभागाला जारी केला.

२०१४ मधील कामाचा नकाशा सादर?मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दोन्ही कंपन्यांना त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. यामध्ये स्टरलाइट कंपनीच्या तपासणीचा अहवाल सादर झाला असून, रिलायन्स कंपनीने २०१४ मधील केबलच्या कामाचा नकाशा सादर केल्याची मनपात चर्चा आहे.

...तर दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींवर गुन्हा!स्टरलाइट कंपनीच्या केबलची तपासणी केली असता दोन ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. रिलायन्स कंपनीने मनपाला सहकार्यच केले नसल्याची बाब लक्षात घेता, वेळप्रसंगी दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. तत्पूर्वी मनपाने २३ व २४ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापकांविरोधात तक्रार नोंदविली असली तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका