शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:08 IST

बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरणासाठी जिल्हाभरातील कामगारांना रात्रंदिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरणासाठी जिल्हाभरातील कामगारांना रात्रंदिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले आहे.अकोल्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात दर आठवड्यात दोनच दिवस हे काम होत आहे. तर एका दिवशी केवळ १५० कामगारांना टोकन देत तेवढ्याच संख्येत नूतनीकरण होत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील नोंदीत कामगारांची संख्या २२ ते २३ हजार असून, त्यापैकी १६ ते १८ हजार कामगारांना नूतनीकरण करावे लागत आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता १५ महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे. तोपर्यंत अनेक कामगारांची नोंदणी मुदतबाह्य होण्याची भीती निर्माण झाली आहे.राज्यात ‘इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६’ हा कायदा लागू आहे. त्या कायद्यानुसार बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवणाऱ्या कल्याणकारी मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे. मंडळाकडे दरवर्षी प्राप्त होणाºया ८ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक उत्पन्नातून कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या वर्षभराच्या कालावधीच्या मुदतीनंतर ६० दिवसांत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. अकोला जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षापर्यंत २२ ते २३ हजार कामगारांनी नोंदणी केली. त्यांच्या नोंदणीची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच नवीन कामगारांची नोंदणी करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. नव्याने नोंदणी व नूतनीकरणासाठी जिल्ह्यातील कामगारांची कमालीची कसरत सुरू आहे. त्यासाठी कामगारांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे.

रात्री नंबर लावल्यास दुसºया दिवशी संधीनूतनीकरणासाठी कामगारांच्या गोरक्षण रोडवरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांच्या रात्रीपासून रांगा लागतात. आठवड्यात दोनच दिवस हे काम केले जाते. रांगेतील १५० कामगारांना टोकन देत त्यांचे काम दिवसभरात केले जाते. त्यामुळे टोकन मिळवण्यासाठी आधीच्या दिवशी सायंकाळपासूनच रांग लागणे सुरू होते. विशेष म्हणजे, तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील टोकाच्या गावातील कामगारांना त्यासाठी कमालीचा त्रास होत आहे.

आतापर्यंत १,५०० कामगारांचे नूतनीकरणआतापर्यंत १,५०० कामगारांची नव्याने नोंदणी व नूतनीकरण झाले आहे. ८ जानेवारीपासून कामाचे १० दिवस मिळाले आहेत. आठवड्यात दोन दिवस, दर दिवशी १५० कामगारांना टोकन, ही गती कायम असल्यास उर्वरित १७ ते १८ कामगारांना १५ महिने लागणार आहेत.

कार्यालयीन मनुष्यबळ तसेच इतरही योजनांचा ताण पाहता आठवड्यातून दोन दिवस या कामाचे नियोजन केले आहे. शासनाकडून येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया आॅनलाइन सुरू होण्याची शक्यता आहे. मुदतीला वेळ असलेल्यांना नूतनीकरणाची त्यामध्ये संधी आहे.- आशीष खंडारकर, दुकाने निरीक्षक, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला