शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी रद्द होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:17 IST

मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील प्रदूषणाला रोखण्यासाठी बीएस-४ मानके असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चनंतर रद्द होत आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनाची नोंदणी होणार नाही. आधी खरेदी केलेल्या मात्र संगणकीय प्रणालीवर नोंदणी प्रलंबित असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या वाहनधारकांना २० मार्चपर्यंत संधी देण्यात येत असून, संबंधितांनी ती करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.देशभरातील प्रदूषणाला वाहनांमधील इंधनाचे ज्वलन हा घटकही कारणीभूत आहे. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल, या पद्धतीने इंधन ज्वलन करण्यासाठी वाहनांमध्ये बदल करण्यात आले. त्यासाठी भारत स्टेज- १ पासून सुरुवात झाली. आता भारत स्टेज चार प्रकारातील वाहनांनाही प्रतिबंध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीच दिलेल्या निर्देशानुसार या वाहनांची परिवहन विभागाच्या संगणकीय प्रणालीत नोंद घेणेही ३१ मार्च २०२० पासून बंद होणार आहे. त्यामुळे आधीच्या काळात खरेदी केलेल्या वाहनधारकांची प्रचंड अडचण होणार आहे. त्यांना संगणकीय प्रणालीत नोंद करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे. अकोला जिल्ह्यात ट्रक, बसेस, दुचाकी, ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे. त्याचवेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संगणकीय नोंद प्रणालीत ४१३ वाहने प्रलंबित असल्याचे पुढे येत आहे. त्याशिवाय, प्रणालीत नोंद नसलेली हजारो वाहने आहेत. त्या वाहनधारकांनी २० मार्चपर्यंत संगणकीय प्रणालीत नोंद न केल्यास ३१ मार्चनंतर त्या वाहनांची नोंदणी पूर्णत: रद्द होणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार यांनी केले आहे.

तरच गुढीपाडव्याला वाहन मिळेल - वरोकारगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्च रोजी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच वाहन त्यांच्याकडे दिले जाणार आहे. त्यासाठी ६ ते ७ दिवस अगोदर शुल्क, कर भरणा तसेच इतरही बाबींची पूर्तता करावी, त्यानंतर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरकाकडून वाहन सुपूर्द केले जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी आवश्यक बाबी आधीच करून घ्याव्या, असे आवाहनही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीसAutomobileवाहन