शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजनांचे नोंदणी अभियान १९ डिसेंबरपर्यंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:02 IST

अकोला: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजना राबविल्या जात आहेत.

अकोला: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचे नोंदणी अभियान १९ नोव्हेंबरपासून १९ डिसेंबरपर्यंत राबविले जात आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात अभियानाची नोंदणी जोरात सुरू झाली आहे.कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी नोंदणी करावयाची आहे. गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकाची प्रत, पासपोर्ट आकाराची ३ छायाचित्रे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेचा लाभ मिळणार आहे. १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नोंदणीचा लाभ कामगार आणि त्यांच्या संघटनांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.*कोण बसतो बांधकामाच्या व्याख्येत?इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, ट्राँसवेज, एअर फिल्ड, पाटबंधारे, जलनिस्सारण, बंधारे, नव्हीगेशन, पूर, टॉवर, कुलिंग टॉवर, धरणे, कालवे, जलाशय, जल, तेल, वायूच्या वाहिन्या, बोगदे, पूल, सेतू आणि पाइपलाइनच्या दुरुस्ती, देखभालीचे काम करणारे सर्व या व्याखेत बसतात. याशिवाय दगड फोडणे, लादी-फरशी काम, रंगकाम-सुतार, नाले बांधणी, इलेक्ट्रिशियन, अग्निशमन यंत्राचे काम, वातानूकुलित यंत्राचे काम, लिफ्ट, विटांचे -कौलांचे काम, सौरऊर्जेशी निगडित काम, स्वयंपाकघरातील काम, उद्याने आदी कामांचादेखील समावेश आहे.अकोल्यातील नोंदणी अभियानासाठी इतर विभागांची मदतअकोल्यात सुरू झालेल्या नोंदणी अभियानासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने वाशिम, अमरावती आणि कामगार कल्याण केंद्रातील कर्मचारी, अधिकारी यांना एका महिन्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना