शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:00 IST

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला. अकोल्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. सर्वपक्षीय नेत्यांनीही त्याकरिता पाठिंबा दिला होता मात्र पहिल्याच दिवशी अकोलेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला नाही. जनतेमध्ये निरूत्साह दिसला अशी खंत व्यक्त करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.पालकमंत्री ना. कडू यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, अकोल्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिकारी आदीसोबत पाच बैठका घेऊन नियोजन केले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली त्यामुळे शहरात कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यूचा एक महत्वाचा मार्ग होता. सर्वपक्षिय बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला पाठींबा दिला होता त्यामुळेच १ ते ६ जून पर्यंत आपण जनतेला जनता कर्फ्यू बाबत आवाहन केले होते मात्र जनतेमध्ये निरूत्साह दिसून आला, फारसा प्रतिसाद मिळाला नाही याबाबत ना.कडू यांनी दू:ख व्यक्त केले आहे. सध्या शहरात काही प्रमाणात दूकाने उघडी आहेत यामुळे कोरोनाची साखळी तुटणार नाही केवळ प्रशासकीय प्रयत्नांमधून कोरोनाला हरविता येणार नाही, लोकांची साथ आवश्यकच आहे असे कडू यांनी स्पष्ट करून जनता कर्फ्यूची मर्यादा तीन दिवसांनी कमी करत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू