अकोला : गौण खनिज अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात महसूल अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाई करून मंगळवारी १0 जणांकडून ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सांगळूद आणि अकोला मंडळांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सांगळूद मंडळांतर्गत मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी देवराव खंडारे यांच्या एमटीव्ही २८३१ या वाहनावर कारवाई केली. अशोक पाटील यांच्या एमएच १३ बी ३८९८ या वाहनासह प्रवीण राणे यांच्या एमएच ३१ एपी ४३१ या वाहनावर कारवाई केली. अकोला मंडळांतर्गत जयसिंग पवार यांच्या एमएच ३0 एबी ९७३, सुनील इंगळे यांच्या एमएच 0४ सीपी ८७६६, देविदास काळदाते यांच्या एमएच ३१ एम ४९0७, वासुदेव बाजोड यांच्या एमएच २६ एच ६५२३, तिवारी यांच्या एमएच ४३ एफ ६३८, एमएच 0६ के ८८0आणि एमएच ३१ डब्ल्यू ४५६९ या वाहनांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या वाहनांच्या मालकांकडून एकूण ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गौण खनिज अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात अकोला तालुक्यात सलग तिसर्या दिवशी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात ९२ हजारांची दंड वसुली
By admin | Updated: May 13, 2014 22:16 IST