शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

कारवाई टाळण्यासाठी खराब डाळ बदलण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:41 IST

पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत येणार असल्याने हा घोळ निस्तरण्याचा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: शासनाकडून एफएक्यू दर्जाचा हरभरा घेतल्यानंतर त्याची डाळ न देणाऱ्या सप्तशृंगी कंपनीकडून खराब डाळीचा पुरवठा झाला. त्या डाळीची अदला-बदल करून घेण्याच्या हालचाली पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व पुरवठादार सप्तशृंगी कंपनीकडून सुरू झाल्या आहेत. एफएक्यू डाळीऐवजी खराब डाळ देणाºया सप्तशृंगी कंपनीच्या घोळामुळे पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत येणार असल्याने हा घोळ निस्तरण्याचा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.खुल्या बाजारात तूर, हरभरा डाळ महागल्याने स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना या डाळींचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्येच घेतला होता. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तूर, हरभºयाची भरडाई करण्याचे ठरले. त्यासाठी (एनईएमएल एनसीडीइएक्स ग्रुप कंपनी) मार्फत भरडाई करणाºया मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनसाठी नवी मुंबईतील सप्तशृंगी मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. शासनाने शेतकºयांकडून हमीभावाने खरेदी केलेला एफएक्यू हरभरा, तूर या मिलर्सला भरडाईसाठी देण्यात आली. नाफेडमार्फत खरेदी केलेले धान्य एफएक्यू (फाइन एव्हरेज क्वॉलिटी) दर्जाचेच असते. त्यासाठी ग्रेडर्सची नियुक्ती केलेली असते. सप्तशृंगी कंपनीने एफएक्यू हरभरा घेतल्यानंतरी त्याची खराब डाळ शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी अनेक जिल्ह्यांत पाठवली. अकोला जिल्ह्यातही हा प्रकार घडला. त्यामुळे पुरवठादार सप्तशृंगी कंपनीने शासनासोबतच लाभार्थींच्या डोळ््यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. लाभार्थींनी ही डाळ न स्वीकारल्याने पुरवठादार कंपनीसोबतच वाटप करणाºया पुरवठा यंत्रणेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता कंपनी आणि पुरवठा यंत्रणेतील संबंधित अधिकारी-कर्मचाºयांनी ही डाळ अदला-बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातून कंपनीसोबतच पुरवठा यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झालेला घोळ निस्तरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

डाळ परत घेण्यास कंपनीची तयारीस्वस्त धान्य दुकानात गेलेली खराब डाळ परत घेण्याची तयारी सप्तशृंगी कंपनीने दाखवल्याचे गोदामातील संबंधितांचे म्हणणे आहे. त्यासाठी साठ्यातून खराब डाळ वेगळी केली जात आहे. या प्रकाराने कंपनीने एफएक्यूऐवजी भलत्याच हरभºयाची डाळ लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. आता अंगलट येत असल्याने सारवासारवही सुरू केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शासन नियुक्त मिलर्सने सणासुदीच्या काळात हा प्रकार केल्याने शासनाचीही मूक संमती असल्याची शक्यताही त्यामध्ये दडलेली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला