शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:38 IST

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देदोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटनअकोल्यातील ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.अकोला येथील सिव्हिल लाइन परिसरातील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, ग्रंथमित्र प्रा.डॉ. एस.आर. बाहेती, प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रकाश मुकुंद, जिल्हा ग्रंथालय संस्थांचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, अमरावतीचे सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी आज पुस्तकांबरोबरच ई-लायब्ररी उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, की वाचन संस्कृती वाढवण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहे, अशी वाचनालये वाढणे अत्यंत गरजेचे आहे. या वाचनालयांना येणार्‍या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल.यावेळी  बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल दीपक गेडाम यांनी केले. संचालन प्रा. गोपाल सुरे यांनी, तर आभार नवल कवडे यांनी केले. यानंतर ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिक स्टॉलला भेट दिली. ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीबरोबरच परिसंवाद, विनोदी एकपात्री कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याचा लाभ वाचकप्रेमींनी घेण्याचे आवाहन गेडाम यांनी केले आहे. ५ डिसेंबर रोजी दु. ४ वा. ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

ग्रंथदिंडी ठरले आकर्षणग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथदिंडीत महिला वारकर्‍यांसोबतच विद्यार्थी, नागरिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी अकोलावासीयांसाठी आकर्षण ठरली.

05सीटीसीएल

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलAkola cityअकोला शहर