शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयाचे नाणे चलनासाठी आता ‘आरबीआय’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:14 IST

अकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर्थिक झळही सोसावी लागते. आता ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेच नाणी चलनासाठी आता पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देमॅसेजसह मिस्ड कॉल करण्याचे नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर्थिक झळही सोसावी लागते. आता ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेच नाणी चलनासाठी आता पुढाकार घेतला आहे.   दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारणेबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. याबाबत वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी अनेकदा प्रकाशझोत घातला. मात्र फारसा परिणाम जनमाणसावर झाला नाही. त्यामुळे अनेकांना दहाच्या नाण्यांसाठी बट्टादेखील सोसावा लागतो आहे. ही बाब अनेकांनी रिझर्व्ह बँकेच्या साइटवर लेखी स्वरूपात कळविली आहे. दहा रुपयांची नाणी का आणि कशासाठी स्वीकारली जात नाही, याबाबत मात्र कुणाकडे ठोस उत्तर नाही. त्यामुळे दहा रुपयांच्या नाणी चलनासाठी आता प्रत्यक्ष रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. अनेकांना यासंदर्भात मोबाइलवर मॅसेज, तर काहींना रेकॉर्डेड कॉल येत आहेत. यासाठी नागरिकांनी आरबीआयच्या १४४४0  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक